Shreya Maskar
पावसाळ्यात फॅमिलीसोबत वन डे ट्रिप प्लान करायची असेल तर अशोक धबधब्याला भेट द्या. पावसाळ्यात येथे निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
अशोक धबधब्याला विहीगाव धबधबा असेही म्हणतात. पावसाळ्यात तुम्ही जर मुंबईजवळ वन डे ट्रिप प्लान करत असाल तर हे ठिकाण उत्तम आहे.
अशोक धबधबा ठाणे/नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर, कसारा आणि इगतपुरी जवळ विहीगाव गावात स्थित आहे. हे ठिकाण मुंबईपासून साधारण ११६ किमी अंतरावर आहे.
अशोक धबधबा १२० फूट उंचीवरून खाली कोसळतो. हे ठिकाणे वॉटरफॉल रॅपलिंगसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येते धुक्याची चादर पाहायला मिळते.
अशोक धबधब्यावर 'अशोका' या हिंदी चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण झाले आहे. शाहरुख खान आणि करीना कपूर खान यांनी येथे शूटिंग केले होते.
तुम्ही येथे ट्रेकिंग, फोटोग्राफीचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही येथे आवर्जून भेट द्या.
भिवपुरी धबधबा, पांडवकडा धबधबा , भगीरथ धबधबा, चिंचोटी धबधबा हे सुंदर धबधबे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.