Shreya Maskar
पावसात आवर्जून कोकणचा फेरफटका मारा. पावसाळ्यात येथील सौंदर्य खुलून येते. तुम्ही येथे कुटुंबासोबत निवांत वेळ घालवू शकता.
रत्नागिरी जिल्ह्यातील मृदानी नदीवर धोपेश्वर धबधबा वसलेला आहे. धोपेश्वर धबधब्याला धूतपापेश्वर म्हणूनही ओळखले जाते. हा दोन टप्प्यांतून खाली येणारा एक निसर्गरम्य धबधबा आहे.
राजापूर शहरापासून अवघ्या ५ किमी अंतरावर धोपेश्वर धबधबा आहे. भगवान शंकराच्या एका प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्ट्या पवित्र मंदिरालगत हे ठिकाण आहे.
धोपेश्वर धबधबा हा येथील 'धूतपापेश्वर मंदिर' साठी प्रसिद्ध आहे. हे १७ व्या शतकातील भगवान शंकराचे पवित्र मंदिर आहे. मंदिरात मंगलमय आणि शांत वातावरण अनुभवता येते.
पावसाळ्यात येथे हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो. डोंगरावर धुक्याची चादर आणि पांढऱ्या शुभ्र आकाशात इंद्रधनुष्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
जुलै ते नोव्हेंबर या काळात म्हणजेच पावसाळ्यात या सुंदर धबधब्याला भेट द्या. तुम्ही येथे हिवाळ्यातही जाऊ शकता. एक सुंदर ठिकाण आहे.
पावसाळ्यात मित्रमंडळी, फॅमिली, जोडीदारासोबत एक ट्रिप नक्कीच प्लान करा. ट्रिपमुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.