Chandrapur News: चंद्रपुरात मृत वाघांचे अवयव हस्तगत, वाघ तस्करी प्रकरणात मोठी माहिती समोर, चीन-थायलंडशी कनेक्शन?

Chandrapur Tiger Poaching Case Ajit Rajgond: मध्यप्रदेशातील या बहेलिया टोळीने २०१३ ते २०१५ दरम्यान विदर्भात किमान १९ वाघांची शिकार केल्याचा संशय वनविभाग आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Chandrapur tiger smuggling case Suspicion grows on Ajit Rajgond
Chandrapur tiger smuggling case Suspicion grows on Ajit RajgondSaamTV
Published On

चंद्रपूर : वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा मोरक्या अजित राजगोंड याला झालेल्या अटक प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात निलफडी जंगल परिसरातून वनविभागाने वाघाचे अवयव हस्तगत केले आहे. कुख्यात तस्कर अजित राजगोंड याने वाघाची शिकार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हस्तगत करण्यात आलेले सर्व अवयव फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे मेघालय राज्याची राजधानी शिलाँग येथून अटक करण्यात आलेल्या माजी सैनिक लालनेईसंग आणि अजित राजगोंड यांच्यात जवळपास २ कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.

या आर्थिक व्यवहारामुळे लालनेईसंग याला पाठवण्यात आलेल्या वाघांची संख्या ही किमान ९ ते १० असण्याची शक्यता आहे. लालनेईसंग याने चीनसोबतच थायलंडमध्ये देखील वाघांचे अवयव पुरवल्याची सूत्रांची माहिती आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने देशातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि वाघ असलेल्या क्षेत्रांना (tiger bearing area) रेड अलर्ट जारी केला आहे, सोबतच WCCB (वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो)ने चंद्रपूरच्या या प्रकरणात एक SIT देखील स्थापन केली आहे, जी अजित राजगोंड अटक प्रकरणात पुढील तपास करीत आहे. यात अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Chandrapur tiger smuggling case Suspicion grows on Ajit Rajgond
Tiger Death : महिनाभरात ११ पट्टेरी वाघांचा मृत्यू; विदर्भातील आकडेवारी चिंता वाढवणारी!

मध्यप्रदेशातील या बहेलिया टोळीने २०१३ ते २०१५ दरम्यान विदर्भात किमान १९ वाघांची शिकार केल्याचा संशय वनविभाग आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे. या शिकारीच्या मागे अजित आणि त्याचे दोन भाऊ, केरू आणि कुट्टू हे प्रमुख सूत्रधार असल्याचे ही पुढे आले आहे. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने २०१५ मध्ये अजितला तिरुपती येथून अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून अजित राजगोंडला शिक्षाही दिली होती. मात्र अलिकडेच सप्टेंबर २०२४ मध्ये अजित हा जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. मात्र अजित राजगोंडासारखा कुख्यात तस्कर अचानक राजुरा तालुक्यात सापडल्याने वनविभागाच्या चिंतेत मोठी वाढ झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com