Women Health: मासिक पाळीतील हा एक बदल जीवघेणा; असू शकतो गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका

Ovarian cancer : सध्या अनेक प्रकारच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे हा त्रास होत असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये ओव्हेरियन कॅन्सरचाही समावेश आहे.
Women Health
Women Healthsaam tv
Published On

ओव्हेरियन कॅन्सर म्हणजेच अंडाशयाचा कर्करोग हा महिलांना प्रभावित करणार्‍या सर्वात घातक कर्करोगांपैकी एक आहे. कर्करोगाने स्त्रियांमध्ये होणारे जगभरातील मृत्यू यांचा विचार केल्यास अंडाशयाचा कर्करोगाचे यामध्ये चौथे स्थान आहे. सध्याच्या परिस्थितीत अंडाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. कॅन्सर तेव्हा होतो ज्यावेळी अंडाशयातील कॅन्सरच्या पेशी वाढू लागतात आणि हळूहळू पसरतात. या प्रक्रियेमुळे कॅन्सरची गाठ तयार होते.

आजकाल अनेक बऱ्याच महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नसल्याची तक्रार जाणवते. बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयात मासिक पाळी येणं तसंत अनियमित मासिक पाळी अशा समस्यांमध्येही वाढ होताना दिसतेय. येत्या काळात हे लक्षण गर्भाशयाच्या कॅन्सरचं देखील असण्याची शक्यता आहे. मात्र बऱ्याच अनेक महिलांना माहिती नसते.

Women Health
World Asthma Day: दमा असलेल्या लोकांनी व्यायाम टाळावा? तज्ज्ञांनी सांगितल्या अस्थमाबाबत असलेल्या गैरसमजुती

जर महिलांना मासिक पाळी न येण्याचा त्रास खूप दिवसापासून असेल शिवाय मासिक पाळीच्या दिवसांमध्ये जास्त रक्तस्राव, कंबर आणि योनी या भागांमध्ये वेदना जाणवत असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेणं आवश्यक आहे.

Women Health
Thalassaemia: लहान मुलांमध्ये थॅलॅसिमियाची 'ही' खास लक्षणं दिसतात; कसे केले जातात यावर उपचार, पाहा

रेडिएशन आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरच्या डॉ. ज्योती मेहता यांनी सांगितलं की, अंडाशयाचा कॅन्सर हा 50 किंवा त्याहून जास्त वय असलेल्या महिलांना होण्याचा धोका होता. मात्र सध्या हा कॅन्सर कोणत्याही वयोगटातील महिलांना होऊ शकतो. रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना या कॅन्सरचा अधिक धोका असतो. जर काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत सूज येणं, ओटीपोटात वेदना किंवा बदल होणं किंवा इतर असामान्य लक्षणं दिसून आली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Women Health
Cancer: हेल्दी म्हणून ब्राऊन राईस खात असाल तर व्हा सावध; शरीरात कॅन्सर सेल्सची होतेय निर्मिती

डॉ. ज्योती मेहता यांनी पुढे सांगितलं की, प्राथमिक टप्प्यात निदान झाल्यास योग्य उपचारांनी आयुर्मान वाढू शकतं. गर्भनिरोधक गोळ्या, गर्भधारणा आणि स्तनपान केल्यामुळे अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.अंडाशयाचा कर्करोगाच्या उपचार पद्धतींमध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिओथेरपीचा समावेश असतो. समूळ रोग नष्ट करण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज पडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com