Thalassaemia: लहान मुलांमध्ये थॅलॅसिमियाची 'ही' खास लक्षणं दिसतात; कसे केले जातात यावर उपचार, पाहा

World Thalassaemia Day : दरवर्षी 8 मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो. हा एक आनुवंशिक रक्ताचा आजार आहे. वेळीच निदान आणि व्यवस्थापन केल्यास एखाद्याचे जीवनमान सुधारता येऊ शकते. या लेखाच्या माध्यमातून आजाराची लक्षणे, निदान आणि उपचारांविषयी माहिती देण्यात आली आहे.
World Thalassaemia Day
World Thalassaemia Day saam tv
Published On

World Thalassaemia Day : देशभरात प्रत्येक वर्षी हजारो मुलांना थॅलॅसिमिया (Thalassemia) हा आजार होतो. दिवसेंदिवस लहान मुलांमध्ये ही थॅलॅसिमियाची प्रकरणं वेगाने वाढत आहेत. थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्त विकार आहे ज्यामध्ये मूल असामान्य हिमोग्लोबिन तयार करण्यास प्रवृत्त होते, ज्यामुळे शरीर कमी लाल रक्तपेशी तयार करू शकते. या असामान्य पेशी योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत आणि मुलाला अशक्तपणा आणि थकवा यांसारखी लक्षणे जाणवू शकतात.

थॅलेसेमिया चे प्रकार कोणते:

अल्फा थॅलेसेमिया

नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्स जनरल फिजीशियन डॉ. बादल ताओरी म्हणाले की, अल्फा थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्त विकार आहे जो संबंधीत व्यक्तीच्या हिमोग्लोबिन उत्पादनावर परिणाम करतो. जेव्हा लाल रक्तपेशींमध्ये अल्फा-ग्लोबिन साखळीची कमतरता असते तेव्हा हा आजार होतो.

World Thalassaemia Day
Thalassemia : भारतामध्ये पीडियाट्रिक थॅलेसेमियाशी संबंधित आव्हाने कोणती आहेत? त्यांचा काय परिणाम होतो?

बीटा थॅलेसेमिया : बीटा थॅलेसेमिया ही अनुवांशिक व्याधी असून, यात तांबड्या पेशीत असलेले हिमोग्लोबिन बाधित होते. बीटा थॅलेसेमिया चे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते:

थॅलेसेमिया मायनर : एक अशी स्थिती जिथे मुलांना सौम्य असा अशक्तपणा असतो परंतु आरोग्यासंबंधीत मोठ्या समस्या नसतात.

थॅलेसेमिया इंटरमीडिया : येथे, मुलांना अधूनमधून रक्त संक्रमणाची आवश्यकता असू शकते.

थॅलेसेमिया मेजर (कुलीज अॅनिमिया ): सर्वात गंभीर प्रकार, यासाठी लहानपणापासूनच नियमित रक्त संक्रमणाची आवश्यकता भासते.

लक्षणं

या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये थकवा आणि अशक्तपणा, फिकट किंवा पिवळसर त्वचा (कावीळ), मंद वाढ आणि विलंबित विकास, वाढलेली प्लीहा (स्प्लीन) किंवा यकृत, हाडांची विकृती, विशेषतः चेहरा आणि कवटीत आणि लाल रक्तपेशींच्या विघटनामुळे गडद रंगाची लघवी होणे अशी लक्षणे दिसून येतात

World Thalassaemia Day
World Asthma Day: दमा असलेल्या लोकांनी व्यायाम टाळावा? तज्ज्ञांनी सांगितल्या अस्थमाबाबत असलेल्या गैरसमजुती

निदान : अशक्तपणा आणि असामान्य लाल रक्तपेशींची संख्या तपासण्यासाठी मुलाला पूर्ण रक्त गणना (CBC) करण्याचा सल्ला दिला जातो. अनुवांशिक चाचणी देखील आजाराचे निदान होते. या स्थितीचे निदान झाल्यानंतर पालकांनी वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

उपचार : रक्त संक्रमण: मुलांमध्ये पुरेसे हिमोग्लोबिन पातळी राखण्यासाठी बीटा थॅलेसेमिया या गंभीर प्रकरणांमध्ये रक्त संक्रमणाची आवश्यकता भासते.

हा आजार असलेल्या मुलांसाठी अस्थिमज्जा प्रत्यारोपण, ज्याला हेमॅटोपोएटिक स्टेम सेल ट्रान्सप्लांट (HSCT) असेही म्हणतात ते फायदेशीर ठरते. या प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या सदोष किंवा खराब झालेल्या रक्त-निर्मिती करणाऱ्या स्टेम पेशींना सुसंगत दात्याकडून निरोगी स्टेम पेशींनी बदलण्यात येते, ज्यामुळे शरीराला सामान्य लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत होते आणि दीर्घकालीन उपचार उपलब्ध होतात.

World Thalassaemia Day
Blood Sugar: चहासोबत टोस्ट खाताय? आताच सावध व्हा; अन्यथा करावा लागेल मोठ्या आजाराचा सामना

थॅलेसेमियावर सारख्या आजारावर आयुष्यभरासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. थॅलेसेमिया असलेल्या मुलांच्या विकासासाठी नियमित वैद्यकीय तपासणी आणि रक्त संक्रमणासह योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या आनुवंशिक विकाराला रोखण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी पालकांसाठी जागरूकता आणि अनुवांशिक समुपदेशन महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com