
Tea and Toast Blood Sugar: चहासोबत काहीतरी खाण्यासाठी आपल्याला लागतं. मग ते बिस्किट असो, वेफर्स किंवा टोस्ट...काहीतरी हेल्दी खायचं म्हणून आपण ब्राऊन टोस्ट खातो. आपल्यापैकी अनेकांना हे कॉम्बिनेशन आवडतंही. मात्र तुम्हाला माहितीये का तुम्ही खात असलेला हा कॉम्बो तुमच्या ब्लड शुगर लेवला झटका देतो.
ज्या व्यक्तींना मधुमेह आहे आणि तुम्ही चहा-टोस्ट किंवा साधा ब्रेड खात असाल तर तुमची शुगर लेवल वाढू शकते. चहा आणि टोस्टचा तुमच्या ब्लड शुगरवर कसा परिणाम होतो ते पाहूयात.
मुळात विशेषतः साखरेचा चहा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकतो. चहामध्ये कॅफेन असून ते शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव काही काळासाठी कमी करतं. यावेळी टोस्टमध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि साखर शरीरात ग्लुकोजमध्ये लवकर रूपांतरित होतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू लागते.
जेव्हा तुम्ही चहासोबत टोस्ट किंवा पांढरा ब्रेड खाता तेव्हा ब्रेडमध्ये असलेले रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि साखर चहासोबत मिसळतात. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. अशा परिस्थितीत मधुमेही रूग्णांना चक्कर येण्याचा धोका उद्भवू शकतो.
चहामध्ये साखर टाकल्याने ब्लड शुगर अचानक वाढते. जर तुम्ही टोस्टवर किंवा ब्रेडवर जास्त बटर किंवा जॅम लावला तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणखी वाढतो. परिणामी रक्तातील साखरेवर अजून वाईट परिणाम होतो. त्यामुळे ज्यांना मधुमेहाता त्रास आहे त्यांनी याचं सेवन करूच नये.
डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असून चहा हा टोस्ट आणि साखरेमुळे रक्तातील साखरेमध्ये तीव्र वाढ होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये ही मात्रा ३०-४० mg/dL पर्यंत वाढण्याचा धोका असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.