Pakistan: पीओकेत दहशतवाद्यांचं 'जंगल मंगल', दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचे फोटो समोर

Pakistan’s Terror Nexus Busted: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वाच्या जंगल मंगल परिसरात दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे. याठिकाणी दहशतवाद्यांना कठोर कमांडो प्रशिक्षण दिले जात आहे. या ट्रेनिंग कॅम्पचे फोटो समोर आले आहेत.
Pakistan: पीओकेत दहशतवाद्यांचं 'जंगल मंगल', दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचे फोटो समोर
Pakistan’s Terror Nexus Busted: Saam Tv
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही

पहलगाम हल्ल्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकच्या दहशतवादी फॅक्टरीचे पुरावे भारताच्या हाती लागलेत. मात्र हे पुरावे काय आहेत? आणि आता पाकिस्तानचा बुरखा कसा फाडला जाणार? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

हा फोटो नीट पाहा... पहलगाम हल्ल्यापुर्वी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि लष्कर ए तोयबाने याच ठिकाणी दहशतवाद्यांना निष्पापांवर गोळ्या चालवण्याचं ट्रेनिंग दिलं.... त्याचे धक्कादायक पुरावे भारताच्या हाती लागलेत... मात्र या पुराव्यांमध्ये नेमकं काय आहे? पाहूयात....

खैबर पख्तुनख्वाच्या जंगल मंगल परिसरात दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे. दहशतवाद्यांना कठोर कमांडो प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणानंतर दहशतवादी भारतीय सीमेजवळील लॉन्च पॅड्सवर तैनात आहेत. सॅटेलाईट फोटोत रहिवासी इमारती, ट्रेनिंग ग्राऊंड, मशीद, गेस्ट मिटींग सेंटर दिसत आहे. फगला बीआर जागेवर दहशतवादी आणि आयएसआयमध्ये बैठका सुरू आहेत. भारतीय सैन्याचं प्रचंड नुकसान करण्याचा डाव आहे.

Pakistan: पीओकेत दहशतवाद्यांचं 'जंगल मंगल', दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचे फोटो समोर
Pakistan : फक्त १०० तासांत पाकचा गेमओव्हर, पाकचं लष्कर पुन्हा गुडघे टेकणार | VIDEO

दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करायला सुरुवात केलीय..याच प्रकरणी एनआयएच्या तपासात लष्कर ए तोयबाचं नाव समोर आलंय...पहलगाम हल्ल्यातील 26 निष्पापांच्या मृत्यूला लष्कर ए तोयबाच जबाबदार असल्याचं समोर आलंय.. एवढंच नाही तर भारतीय लष्करानं जम्मूच्या पुँछ जिल्ह्यातील सुरनकोटमधून भारतानं स्फोटकं जप्त केली आहे. यामध्ये IED, 1-5 लीटरचे गॅस सिलिंडर, काळ्या रंगाची दुर्बिण, 2 वायरलेस सेट, 2 टोप्या, 3 काळ्या रंगाच्या पँटस् जप्त करण्यात आल्या आहेत.

Pakistan: पीओकेत दहशतवाद्यांचं 'जंगल मंगल', दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचे फोटो समोर
India Pakistan Tension : पाकिस्तान तोंडावर पडला, मदत मागायला गेला पण संयुक्त राष्ट्राने फटकारले

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे नापाक इरादे भारताने नेस्तनाबूत केले. मात्र या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्यासाठी लष्कराने कोणती रणनीती आखायला हवी? भारत शांत आणि संयमी असल्याचा गैरफायदा पाकिस्तान्यांनी घेतलाय. मात्र आता भारत दहशतवाद्यांचे पुरावे एकत्र करुन पाकचा बुरखा फाडणार हे निश्चित... मात्र भारतानं एवढ्यावरच न थांबता पुन्हा एकदा थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स, ट्रेनिंग सेंटर उध्वस्त करुन दहशतवाद्यांचं आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याची गरज आहे.

Pakistan: पीओकेत दहशतवाद्यांचं 'जंगल मंगल', दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचे फोटो समोर
India vs Pakistan: भारताचा 'वॉटर स्ट्राइक' चिनाब कोरडी; पाकिस्तानच्या घशाला कोरड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com