India vs Pakistan: भारताचा 'वॉटर स्ट्राइक' चिनाब कोरडी; पाकिस्तानच्या घशाला कोरड

Chenab Dam Water: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणीवाटप कराराला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारतानं पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केलीय. त्यावर पाकच्या घशाला कोरड पडलीय. ते कशी पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Chenab Dam In Jammu kashmir
Chenab Dam Watersaam tv
Published On

सुप्रीम मस्कर, साम प्रतिनिधी

भारताच्या वॉटर स्ट्राइकनं पाण्याच्या थेंबा-थेबासाठी आता पाकला वणवण करावी लागणार आहे. आधी सिंधू जल करारला स्थगिती देऊन भारतानं पाकच्या घशाला कोरड पाडली आणि आता जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचं पाकिस्तानमध्ये वाहणारं पाणीही बंद करण्यात आलयं. त्यामुळे पाकच्या घशालाच नाही तर खिशालाही कोरड पडणार आहे, कशी पाहूया.

Chenab Dam In Jammu kashmir
India vs Pakistan: भारताचा धसका; तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, भारत ठेचणार तुर्कीचा आगाऊपणा?

भारताचा वॉटर स्ट्राईक इथेच थांबणार नाही तर भारताकडून झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याची योजनाही आखली जाण्याची शक्यताय. त्यामुळे पाकची अवस्था आणखीनच बिकट होणार आहे.

पाकच्या घशाला कोरड?

पाकमधील चिनाबलगतच्या भागात पाणीटंचाई

पाकच्या सिंध आणि पंजाब प्रांतातील शेतीला थेट नुकसान

गहू आणि इतर कृषीउत्पादनाला मोठा फटका

वॉटर स्ट्राईकचा 'किशनगंगा' पॅटर्न

किशनगंगा धरणातून नीलम आणि झेलम खोऱ्यांना पाणीपुरवठा

पाकिस्तानचे जलविद्युत प्रकल्प किशनगंगा धऱणावर अवलंबून

कृषी अर्थव्यवस्था आणि शहरी पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार

पाकिस्तानातील वीजउत्पादनावर परिणाम

Chenab Dam In Jammu kashmir
Seema Haider Photo: सीमा हैदर पाकिस्तानची सैनिक? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

'रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही' या धोरणानुसारच भारताची कारवाई सुरू आहे. एकीकडे युध्दसराव सुरू करून भारत पाकिस्तानला आव्हान देत असतानाच बागलीहार धरणाचे दरवाजे बंद करणे हा भारताच्या रणनीतीचा एक भाग आहे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्धाआधीच भारतानं पाकची पुरती नाकेबंदी केलीय, हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com