India vs Pakistan: भारताचा धसका; तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, भारत ठेचणार तुर्कीचा आगाऊपणा?

India vs Pakistan: भारताचं नौदल पाकला बेचिराख करण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळेच आता पाकच्या मदतीला तुर्कस्तान धावलाय. मात्र तुर्कस्तान एवढा अतिशहाणपणा का करतोय? आणि भारत तुर्कांची कशी कोंडी करु शकतो? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Turkey Comes To Pakistan Aid
India vs Pakistan
Published On

भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीने पाकिस्तानचा थरकाप उडालाय. त्यामुळे घाबरलेला पाकिस्तान तुर्कीपुढे गडागडा लोळलाय आणि तुर्कीने अति शहाणपणा करत कुरापतखोर पाकच्या मदतीला टीसीजी ब्युकाडा ही युद्धनौका पाठवलीय. ही युद्धनौका कराची बंदरात युद्धनौका दाखल झालीय. एवढंच नाही तर तुर्कीने पाकिस्तानसोबत युद्धसरावाला सुरावात केलीय.

पाकिस्तान घाबरला, तुर्की मदतीला

तुर्की दीर्घकाळापासून पाकिस्तानचा सामरिक भागीदार

तुर्कीची युद्धनौका 'टीसीजी ब्युकाडा' पाकिस्तानच्या कराचीत दाखल

तुर्कीकडून लष्करी ड्रोनची पाकला मदत

पाकिस्तानच्या पाणबुड्यांच्या आधुनिकीकरणासाठी तुर्कीची मदत

काश्मीरसंर्दभातील तुर्कीच्या भूमिकेवर भारताचा अनेकदा आक्षेप

Turkey Comes To Pakistan Aid
India Pakistan Tension: नापाक इराद्यांचे नवे चेहरे, दहशतवादाचे तरुण चेहरे कोण? तरुणांना भडकवणार,दहशतवादी घडवणार?

पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवायांना पाठबळ दिलं जातं. मात्र तरीही तुर्कीचं पाकप्रेम उफाळून येतंय. त्यामागचं कारण काय आहे? पाहूयात.

जागतिक स्तरावर तुर्की मुस्लीम देशांचं नेतृत्व करण्यास उत्सुक

पाकला मदत करुन खलिफा असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न

पाकिस्तान किंवा इतर इस्लाम राष्ट्रांनाही तुर्कीची मदत

पाक आणि तुर्की शेजारी असल्याने व्यापारी संबंध

त्यामुळेच भारताविरोधात लष्करी दबाव वाढवणाऱ्या तुर्कीच्या नांग्या कशा ठेचता येतील? याविषयी आम्ही संरक्षण तज्ज्ञांकडून जाणून घेतलंय. खरंतर भारताविरोधातील कुरापतीत सहभागी होणाऱा तुर्की हा पहिला देश नाही. तर 1965 मधील युद्धावेळी इंडोनेशियाने युद्धनौका पाकच्या मदतीला पाठवली होती. मात्र भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला.

Turkey Comes To Pakistan Aid
India-Pakistan Tension : पाकची घेराबंदी, बलुच आर्मीनेही घातला घाव; आता पाकचे तुकडे-तुकडे होणार?

तर आता पाकच्या ताफ्यात भारताच्या आयएनएस विक्रांतच्या ताकदीची एकही युद्धनौका नाही. त्यामुळेच पाकने तुर्कीची मदत घेतलीय. मात्र तुर्कीनेही ही लढाई धर्मावर नेण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे अति आगाऊपणा करणाऱ्या तुर्कीच्या नांग्या ठेचण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव वाढवण्याची गरज आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com