Uddhav thackeray News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; कोकणातील आणखी एका नेत्याने सोडली साथ

Uddhav thackeray Latest News : ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसलाय. कोकणातील आणखी एका नेत्याने साथ सोडली आहे.

Vishal Gangurde

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या राजन साळवी यांनी शिंदे गटाची साथ धरली. साळवीनंतर ठाकरे गटाचा आणखी एक नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा मार्गावर आहे. ठाकरे गटाचा रोहा तालुका प्रमुख लवकरच ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याचं निश्चित झालं आहे. रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे हे लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे कोकणात ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसला आहे.

रायगडच्या रोह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचा रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. शेडगे यंनी पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवून दिला आहे. त्यानंतर ते येत्या 13 एप्रिल रोजी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपास्थितीत रोहा येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

समीर शेडगे हे पूर्वाश्रमीचे सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र आठ वर्षांपूर्वी रोहा नगर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याने शेडगे पक्षातून बाहेर पडले आणि अपक्ष निवडणूक लढवली. त्यानंतर शेडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

पुण्यातही ठाकरेंना धक्का

दरम्यान, पुण्यातही काल ठाकरेंना मोठा धक्का बसला. पुण्यातील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. पुण्यातील या महिला पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचं काम थांबवलं आहे. पक्षातील वरिष्ठ लक्ष देत नसल्याच्या कारणावरून त्यांनी पक्षाचं काम थांबवलं आहे. पुण्यातील या ३२ महिला पदाधिकारी शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. त्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची देखील चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT