Vidarbha News : रीलस्टारचा भरचौकात सिग्नलवर महिलेसोबत धिंगाणा; विदर्भातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

vidarbha news in marathi : अमरावती जिल्ह्यात एका रिलस्टारचा धिंगाणा समोर आला आहे. एका रिलस्टारने भरचौकात महिलेसोबत नृत्य केलं आहे. विदर्भातील महत्वाच्या घडामोडी वाचा.
vidarbha
vidarbha news saam tv
Published On

रीलस्टारचा धिंगाणा

अमरावतीमध्ये एका रीलस्टारने भरचौकात सिग्नलवर महिलेसोबत नृत्य करत व्हिडिओ तयार केल्याचा प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे सिग्नल ग्रीन झाल्यानंतरही त्यांचे हे नाचगाणे सुरू होते. तर वाहतुकीला अडथळा होईल असं कृत्य कोणीही करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई होणार, असा इशारा पोलिसांनी दिलाय...

'हिट अँड रन'चा थरार

अकोल्यात 'हिट अँड रन'चा थरार पाहायला मिळालाय.. सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आल्यात.. कार चालकाने एका दुचाकीला तब्बल दीड किमीपर्यंत फरफटत नेले...पुढे चार ते पाच वाहनांना त्याने धडक दिली...यात अनेक जण जखमी झाले असून नागरिकांनी कारचालाचा पाठलाग करत त्याला चांगलाच चोप देत कारची तोडफोड केलीय.

गजानन महाराजांच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी विशेष कुलर

देवाला सुद्धा थंडावा मिळावा म्हणून विशेष कुलरची सोय करण्यात आलीय. अकोल्याच्या टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरातील गजानन महाराजांच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी विशेष कुलरची सोय करण्यात आलीये. दरम्यान शहरात तापमानाचा पारा 44 अंशाच्या पार पोहोचलाय.

vidarbha
Dominican Republic Roof Collapse : नाइट क्लबच्या पार्टीत छत कोसळलं; १०० जण दगावले, सेलिब्रिटींचाही मृत्यू

5 शववाहिका धूळ खात

यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागाच्या 5 शववाहीका धूळ खात पडल्याय. आरोग्य विभागाला राज्य शासनाकडून शववाहिन्या मंजूर झाल्या असून एका गाडीची किंमत 30 लाख आहे. मात्र या गाड्या अजूनही रुग्णांच्या सेवेसाठी वापरत नसल्याचं समोर आलंय.

vidarbha
Ramdas Athawale : डोनेशन गोळा करण्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंवर तुफान हल्लाबोल, VIDEO

अमरावतीहून मुंबईला जाणाऱ्या विमानाचं तिकीट बुकिंग फुल्ल

अमरावतीवरून मुंबईला जाणाऱ्या पहिल्याच विमानाचं तिकिटं बुकिंग फुल्ल झालं आहे. 16 एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिलं विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. अलायन्स एअरलाइनवर विमान प्रवासाची जबाबदारी आहे.

vidarbha
Prashant Koratkar bail : मोठी बातमी! इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण, प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

अमरावतीत सायंकाळी हवेत थंड गारवा

अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर अमरावती जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी जोरदार वारा सुटला होता. त्यामुळं वाहनधारकांना वाहन चालवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. सोबतच ढगाळ वातावरण आणि विजेचा कडकडाट होता. दिवसभर अमरावतीत कडक ऊन तापलं होतं. परंतु सायंकाळी सहा वाजल्यानंतर हवेत थंड गारवा आणि वारा होता. वाढत्या तापमानापासून अमरावतीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच अमरावती आणि अकोला जिल्ह्याच्या सिमेवरील गावांत काहिसा तूरळक पाऊस झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com