Akola Temperature: देवालाही सहन होईना उकाडा; गारव्यासाठी देवाला कुलरचा सहारा

Coolers Installed In Akola Temple: अंगाची लाही लाही करणारं तापमानापासून बचाव करण्यासाठी नागरिक घरात राहणं पसंत करत आहेत. अकोल्यातील तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत गेलंय. यामुळे नागरिकांसह देवालाही उकाडा असह्य झालाय.
Akola Temperature
Coolers Installed In Akola Templesaam tv
Published On

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

विदर्भात सूर्य आग ओकत असून अकोला जिल्ह्यातील तापमान ४४ डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. उन्हाच्या उकाड्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. अंगाची लाही लाही होत असून उन्हाच्या चटक्याने नागरिक हैरान झालेत. नागरिकच नाही तर देवालाही उकाडा असह्य झालाय. त्यामुळेच शहरातील देवांना गारव्यासाठी कुलरचा आसरा घ्यावा लागत आहे.

राज्यातील तापमानाचा पारा वाढलाय. अनेक जिल्ह्यात उष्णतेचा लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय. यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी नागरिक एसी, पंखा चालवत आहेत. अंगाची लाही लाही करणारा उकाडा देवांनाही असह्य झालाय. अकोल्यामधील मंदिरांमध्ये देवाच्या मूर्त्यांना गारवा मिळावा यासाठी विशेष सोय केल्या जात आहेत.

देवांच्या मूर्त्यांना गारवा मिळावा, यासाठी मंदिरात कुलरची सोय करण्यात आलीय. अकोल्याच्या टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरातील गजानन महाराजांच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी विशेष कुलरची सोय करण्यात आलीये. दरवर्षीसारखाच यंदाचा उन्हाळाही अकोलेकरांची चांगलीच परीक्षा घेत आहे.

गेल्या दोन दिवसांत अकोल्याचे कमाल तापमान 44 अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे अकोलेकर यंदाच्या उन्हाळ्यात घरात कुलरच्या समोरच बसून राहणे पसंत करतायेत. देवांसुद्धा उकाडा असह्य झालाय. या विक्रमी तापमानाने देवाला कुलरची हवा खावी लागत आहे.अकोल्याच्या मंदिरांमध्ये देवाची मूर्ती थंड राहावी. कडक उन्हाळ्यात देवाला ही दिलासा मिळावा, यासाठी गाभाऱ्यात मूर्तीच्या अगदी बाजूला विशेष कुलरची सोय करण्यात आलीय.

Akola Temperature
Weather Update : राज्यात ऊन पावसाचा खेळ; विदर्भात उष्णतेची लाट, तर कुठे बरसणार पाऊस?

विदर्भात सध्या सर्वत्र विक्रमी तापमानाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. अकोल्यात पारा ४४अंशांवर गेल्याने नागरिक घराच्या बाहेर पडण्याची हिम्मत करताना दिसत नाहीत. घरात एसी, कुलर,पंखा लावून उन्हाच्या उकाड्यापासून स्वत:चं संरक्षण करत आहेत. अंगाची लाही-लाही करणाऱ्या तापमानापासून देवाचे संरक्षण करण्यासाठी मंदिरात कुलर लावण्यात आले आहेत.

टिळक रोडवरील मोठ्या राममंदिरातील गजानन महाराजांच्या मूर्तीला कुलरचा विशेष सेवा देण्यात येत आहे. मूर्तीसाठी कुलर लावण्यात आलेल्याने याला कोणी अंधश्रद्धा मानू नये, असं मंदिर व्यवस्थापकांनी सांगितलंय.

Akola Temperature
Narayangad Lake : दहा गावांची तहान भागवणारा नारायणगड तलावाने गाठला तळ; पाणीटंचाईचे संकट

मंदिर व्यवस्थापनानुसार त्यामागे धार्मिक आणि शास्त्रीय दोन्ही कारणे आहेत. पूजेच्या वेग वेगळ्या विधीनुसार मानस पूजा पद्धती एक मान्य पद्धत आहे. त्यामध्ये देवाचा अस्तित्व मान्य करत त्याला स्वतःचा सखा मानत त्याची सर्व अंगाने काळजी घेण्याची पद्धत आहे. कडक उन्हाळ्यामुळे देवाला त्रास होत असेल असे मान्य करत देवाच्या मूर्तीच्या बाजूला विशेष कुलर लावण्यात आले आहे. ज्याप्रमाणे घरातील व्यक्तीची काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे देवाची काळजी नको का घ्यायला असा विचार यामागे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com