Ramdas Athawale : डोनेशन गोळा करण्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंवर तुफान हल्लाबोल, VIDEO

Ramdas Athawale News : रामदास आठवलेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. डोनेशन गोळा करण्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना केल्याची टीका आठवलेंनी केली.
Ramdas Athawale Raj Thackeray
Ramdas Athawale Raj ThackeraySaam Tv
Published On

उत्तर भारतीय विकास सेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी कोर्टात केली आहे. मनसे पक्षाची मान्य रद्द करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. उत्तर भारतीय विकास सेनेच्या मागणीला मनसैनिकांनी कडाडून विरोध केला. आता उत्तर भारतीय विकास सेनेच्या मागणीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. यावेळी आठवलेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही.

Ramdas Athawale Raj Thackeray
Deenanath Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालयाचा आणखी एक हलगर्जीपणा समोर; तनिषा भिसेंना स्ट्रेचरच दिलं नाही

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्याच्या मावळच्या कामशेत येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आलंय. या शिबिरानंतर माध्यमांशी बोलताना आठवलेंनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला. रामदस आठवले म्हणाले, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात एकाने कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर न्यायालय योग्य निर्णय देईल. अनेक पक्ष डोनेशन गोळा करण्यासाठी स्थापन केलेले आहेत. पक्षाच्या नावावर डोनेशन गोळा करायचा, एवढेच काम त्यांचा आहे. मात्र माझ्या पक्षाचे गावागावात शाखा आहेत. कोर्ट सर्व बाजूने विचार करेल आणि मगच निर्णय देईल'.

Ramdas Athawale Raj Thackeray
Weather Update : राज्यात ऊन पावसाचा खेळ; विदर्भात उष्णतेची लाट, तर कुठे बरसणार पाऊस?

आठवलेंनी दलित पँथरवरही भाष्य केलं. रामदास आठवले म्हणाले, ' बाबासाहेब आंबेडकर स्वप्न साकार करायचं असेल तर व्यापक पक्षाची उभारणी करणे आवश्यक आहे. तरुणांचा सहभाग या पक्षात असायला पाहिजे. दलित पॅंथर पुन्हा स्थापन करायची का? यावर चर्चा करण्यात आली. पॅंथरही देश देशभर वाढू शकते'.

Ramdas Athawale Raj Thackeray
Prashant Koratkar bail : मोठी बातमी! इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण, प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर

'सत्तेत माझा सहभाग जरी असला तरी माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. अनेक वेळा भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा केली असता फक्त आश्वासन मिळतात. सत्तेचा वाटा मिळत नाही, असं म्हणत आठवले यांनी महायुती सरकारवर लगावला.

'सोमनाथ सूर्यवंशी यांची केस प्रकाश आंबेडकर लढणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर आपला उद्रेक व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या त्या तरुणाला मारझोड करण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा विद्यार्थी होता. मात्र प्रकाश आंबेडकर त्यांची बाजू मांडतात हे चांगलं आहे. कारण ते चांगले वकील आहेत. ते कोर्टाच्या आतमध्ये बाजू मांडणार आहेत. तर मी कोर्टाच्या बाहेर बाजू मांडणार आहे', असे आठवले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com