Key accused in the TCS conversion case faces scrutiny as shocking details of identity change and alleged Malaysia link emerge during court proceedings. Saam Tv
महाराष्ट्र

पीडितेचं नाव बदललं, मलेशियाला पाठवण्याचा डाव, TCS धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव कनेक्शन आलं समोर

TCS Conversion Case Nashik Latest Update: टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पीडितेचे नाव बदलून मलेशियाला पाठवण्याचा कट असल्याचे वकिलांनी सांगितले आहे.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या TCS धर्मांतर प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा समोर आला असून आरोपी निदा खान हिच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. नाशिकरोड न्यायालयाचे न्यायमूर्ती के.जी. जोशी यांनी या अर्जावरील निकाल राखून ठेवला असून 2 मे रोजी यावर अंतिम निर्णय दिला जाणार आहे. तो पर्यंत निदा खानला कोणतेही कायदेशीर संरक्षण मिळालेले नसल्याने तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

पीडितेचे नाव बदलले; मलेशियाला पाठवण्याचा होता डाव

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना अनेक गंभीर बाबी मांडल्या. पीडित महिलेचे धर्मांतर करून तिचे नाव 'हनिया' ठेवण्यात आले होते. इतकेच नव्हे तर तिला मलेशियामध्ये 'इम्रान' नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठवण्याचा मोठा कट आरोपींनी रचला होता. या प्रकरणात 'मालेगाव पार्टी' नावाचा उल्लेख समोर आला असून मनी ट्रेल (आर्थिक व्यवहार) आणि आंतरराष्ट्रीय धागेदोरे असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

धार्मिक ब्रेनवाशिंग: निदा खानने पीडितेच्या मोबाईलमध्ये इस्लामिक ॲप्स डाऊनलोड करून दिले होते आणि तिला वारंवार नमाज पठण, हिजाब आणि बुरखा घालण्याचे प्रशिक्षण दिले.

साहित्य पुरवणे: पीडितेला मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र जीवन हे पुस्तक आणि धर्मांतरासाठी प्रवृत्त करणाऱ्या सोशल मीडिया लिंक्स पुरवण्यात आल्या. तसेच आरोपी दानिश शेख याने पीडितेची शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेतली होती, ज्याद्वारे तिचे नाव बदलण्याची प्रक्रिया केली जाणार होती.

पोलीस तपासातील महत्त्वाचे मुद्दे

सरकारी पक्षाने जामिनाला कडाडून विरोध केला आहे. निदा खान फरार असताना तिला कोणी आसरा दिला? तिला या गुन्ह्यासाठी कोणी अर्थसाहाय्य केले? आणि तिने अशाच प्रकारे इतरही काही तरुणींना जाळ्यात ओढले आहे का? या सर्व गोष्टींचा तपास करणे अद्याप बाकी आहे. निदा खानला जामीन मिळाल्यास ती साक्षीदारांवर दबाव आणू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 : KKR च्या युवा फलंदाजावर बीसीसीआयची मोठी कारवाई, रागाच्या भरात केलेलं कृत्य भोवलं

Bhau Kadam: एकांकिकेत काम करणाऱ्या मुलीची बहिण आवडली, हटके स्टाईल केलं प्रपोज; भाऊ कदमची फिल्मी लव्हस्टोरी

Heatstroke Tips: उष्माघात टाळण्यासाठी 'या' गोष्टी करणं टाळा, वाचा कशी घ्यायची काळजी?

Manohar Bhosale: भोंदू मनोहर मामाचा नवा करनामा; प्रसाद म्हणून आंबा,पेरू तीन हजार रुपयाला विकायचा

मंत्री नितेश राणेंना एक महिन्याचा कारावास, राज्याच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT