Manohar Bhosale: भोंदू मनोहर मामाचा नवा करनामा; प्रसाद म्हणून आंबा,पेरू तीन हजार रुपयाला विकायचा

Fake Godman Manohar Bhosale Scam: बाळू मामाचा अवतार' भासवून भाविकांची लूट करणारा मनोहर भोसलेचा नवा कारनामा समोर आला आहे.
Fake Godman Manohar Bhosale Scam:
Police investigation reveals shocking fruit scam by fake godman Manohar Bhosalesaam tv
Published On
Summary
  • भोंदूबाबा मनोहर भोसलेचा फसवणुकीचा प्रकार उघड

  • प्रसाद म्हणून फळे देत मोठ्या रकमेची वसुली

  • एका पेरूसाठी २ हजार रुपये आकारल्याचा आरोप

भरत नागणे, साम प्रतिनिधी

भोंदूबाबा मनोहर भोसले याला अटक करण्यात आल्यानंतर त्याचे एक एक कारनामे आता समोर आले आहे. दैवी शक्ती असल्याचं भासवत या भोंदूबाबाने अनेकांची आर्थिक लूट केली आहे. मनोहर बाबाचा आणखी एक चक्रावून टाकणारा कारनामा पोलीस तपासात समोर आला आहे. आश्रमातील शेतात असलेल्या पेरू आणि आंब्याची बागेतील फळांना तो भाविकांना प्रसाद म्हणून द्यायचा. इतकेच नाहीतर तो एका पेरूसाठी आणि १२ आंब्याच्या पेटीसाठी २ ते ३ हजार रुपये घ्यायचा, अशी माहिती तेथील स्थानिकांनी दिली आहे.

Fake Godman Manohar Bhosale Scam:
मुलीकडून पैशांसाठी तगादा, ७ दिवसांपासून बेपत्ता; टिटवाळ्यातील वयोवृद्ध दांपत्यासोबत काय घडलं? आत्महत्या की घातपात?

करमाळ्याचा भोंदू महाराज मनोहर भोसले भविष्य पाहण्यासाठी येणाऱ्या भोळ्या भाबड्या भाविकांची आर्थिक लूट करायचा. मनोहर भोसले चक्क आपल्या आश्रमातील एक पेरू २ हजार रुपयांना तर बारा आंब्याची एक पेटी ३००० रुपयांना प्रसाद म्हणून विकायचा. यातून भोसले कोट्यवधी रुपयांची कमाई करायचा. आमवस्या पोर्णिमेच्या रात्री तो भाविकांची आर्थिक लूट करून कोट्यवधी कमवत होता, असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

Fake Godman Manohar Bhosale Scam:
Crime News : ट्रेनच्या लोकोपायलटवर गोळीबार, दुचाकीवरून आले होते हल्लेखोर; हल्ल्याचे कारण धक्कादायक

मनोहर भोसलेने घोटी गावामध्ये २७ एकरावर आलिशान आश्रम उभारला आहे. याच आश्रमाच्या परिसरात पेरू, आंबा, नारळची लागवड केली आहे. मनोहरनं फळबागेसाठी लागणारं पाणी पाझर तलावातून चोरून आणलं होतं. त्याने मोटर लावून तलावातील पाणी शेततळ्यात सोडलं होतं. त्याच शेततळ्याच्या पाण्यातून त्याने फळबाग फुलवली होती. या बागेतील आंबा, पेरू प्रसाद म्हणून भाविकांना देत असायचा.

त्याच्या आश्रमात दर अमावस्येला अनेक भाविक मोठ्या संख्येने भविष्य पाहण्यासाठी येतात. येणाऱ्या भाविकांना तो प्रसाद म्हणून एक पेरू दोन हजार रुपयांना तर बारा आंब्याची एक पेटी तीन हजार रुपयांना विकायचा. यातून त्याने कोट्यवधी रुपयांची माया जमा केली आहे. यासारखे असे अनेक धक्कादायक खुलासे या निमित्ताने समोर येऊ लागले आहेत.

मूळचा इंदापूर तालुक्यातील मनोहर भोसले डीएडमध्ये नापास झाला आहे. त्यानंतर तो सुके बोंबिल विकून घर चालवत असायचा. पण त्यातून फारशी मिळकत होत नसल्याने तो अचानक गायब झाला. काही काळ बेपत्ता राहिल्यानंतर तो गावात परतला. त्याने ‘मनोहर मामा’ हे नाव धारण करून भोंदूगिरी सुरू केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com