राज्यातल्या खासगी शाळांनी पालकांच्या लुटीचा धंदा सुरू केलाय. साम टीव्हीच्या स्टींग ऑपरेशन शाळांच्या नफेखोरीचं बिंग फुटलंय. शाळांनी थेट पुस्तक प्रकाशन संस्थांसोबत साटंलोटं करुन पालकांना गंडा घालण्याचा लुटीचा नवा पॅटर्न राबवायला सुरुवात केलीय़. विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तकं आम्ही सांगितलेल्या दुकानातूनच घ्यायची, असं सुल्तानी फर्मान शाळांनी काढलंय..त्याबाबत पालकांनी साम टीव्हीला माहिती दिली आणि सुरू झालं साम टीव्हीचं इन्व्हेस्टीगेशन...
पालकांच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी आणि लुटीच्या ऑपरेशनचा भांडाफोड करण्यासाठी साम टीव्ही पोहोचली पुण्यातील खासगी शाळेत.... शाळेच्या आवारातच एका खासगी विक्रेत्याची शाळेनं नेमणूक करुन पालकांची लूट सुरु केलीय... साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान शिक्षणाचा मांडलेला बाजार कॅमेऱ्यात कैद झालाय...
मात्र कोणत्या इयत्तेच्या पुस्तकांची किती किंमत वसूल केली जातेय...पाहूयात...
कोणत्या इयत्तेच्या पुस्तकं किती किंमतीला ?
सिनियर केजी 3744
इयत्ता पाचवी 7172
इयत्ता सहावी 8527
इयत्ता सातवी 9217
इयत्ता आठवी 9881
खासगी शाळांकडून पालकांच्या लुटमारीची ही आणखी एक मोडस ऑपरेंडी धुळ्यात आढळून आलीय...
खरं तर राज्याच्या शिक्षण खात्यात दररोज नवनवे घोटाळे समोर येत आहेत.. कधी शालार्थ आयडीचा घोटाळा करुन शिक्षक भरतीचा घोटाळा केला जातोय.. तर कधी बोगस शाळा आढळून येताहेत... त्यानंतरही शिक्षण खात्याला काही जाग येत नाही.. आता साम टीव्हीनं खासगी शाळांकडून सुरु असलेल्या पालकांच्या लुटीचं ऑपरेशन उघड केलंय.. मात्र शिक्षण खातं आता तरी जागं होणार का? शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे पालकांची फसवणूक करणाऱ्या शाळा आणि अवाजवी किंमतीला पुस्तकं विकणाऱ्या प्रकाशकांवर कारवाई करणार की या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय... मात्र साम टीव्ही शिक्षण खात्यातील घोटाळ्यांचा पर्दाफाश करत राहणार, हे मात्र निश्चित....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.