Marathi Actor On Manohar Mama: भोंदू मनोहर मामाचं मराठी टीव्ही इंडस्ट्रीशी कनेक्शन? या मराठमोळ्या अभिनेत्याने केला मोठा आरोप

Marathi Actor On Manohar Mama: मनोहर मामा प्रकरणात मराठी अभिनेता ओंकार कर्वेची पोस्ट चर्चेत. टीव्ही इंडस्ट्रीशी कनेक्शन आणि मालिकेला फंडिंगचा संशय; निर्मात्याच्या चौकशीची मागणी.
Marathi Actor On Manohar Mama
Marathi Actor On Manohar MamaSaam tv
Published On

Marathi Actor On Manohar Mama: सध्या राज्यभरात चर्चेत असलेल्या स्वतःला 'बाळूमामाचा अवतार' म्हणणारा भोंदूबाबा मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात मराठी अभिनेता ओंकार कर्वे याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्याने मनोहर मामाचा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

मनोहर भोसले याला अलीकडेच सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर भोंदूगिरी, फसवणूक आणि इतर गंभीर आरोप आहेत. त्याने स्वतःला संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Marathi Actor On Manohar Mama
Raja Shivaji: 'राजा शिवाजी'ची तुफान क्रेझ; बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालणार, अॅडव्हान्स बुकिंगसाठी धडाकेबाज सुरुवात

या पार्श्वभूमीवर अभिनेता ओंकार कर्वे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत मनोहर मामाचा टेलिव्हिजन इंडस्ट्रीशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, नमस्कार, मी कलाकार आहे. अनेक ठिकाणी माझी बदनामी करणारा अनेकाना सेटवर मारहाण करणारा. शिवीगाळ करणारा निर्माता जो अनेक वर्ष दादासाहेब फाळके चित्रनगरी इथे एका संत महात्म्यावर टीव्ही शो करत होता. त्याला शोला सगळा पैसा हा मनोहर मामाचा लागला का ? असा मला प्रश्न आहे त्या निर्मात्याची संपूर्ण चौकशी व्हावी. त्याचे SDR आणि cctv फुटेज बाहेर काढावे. या मामाच्या जीवावरच सगळ्यांना धमकी देणं. कोणी माझं काही बिघडवू शकत नाही. माझ्या अंगाला कोणी हात लाऊ शकत नाही. इतकी याची हिंमत. हे सगळी या मामामुळे. या माणसाची सुद्धा चौकशी व्हावी. ज्यांना जे जे माहित आहे ते त्यांनी उघड उघड बोला नाहीतर येणाऱ्या नवीन कलाकारांना सुद्धा खूप गोष्टी भोगाव्या लागतील. वेळीच जागे व्हा

Marathi Actor On Manohar Mama
Aamir Khan: अमिर खानसोबत नेमकं काय घडलं? हमसून रडला, शर्टाने पुसले डोळे, VIDEO व्हायरल

दरम्यान, ओंकार कर्वे हे मराठी मालिकांमधील ओळखीचा चेहरा असून त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते  'स्टार प्रवाह' या लोकप्रिय वाहिनीवरील 'उदे गं अंबे...'मालिकेत काम केलं आहे. याव्यतिरिक्त त्यानं 'स सासूचा', 'स्वप्न तुझे नी माझे', 'निर्भया' या मराठी सिनेमांमध्येही काम केलंय. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com