Beed Politics Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : धनजंय मुंडेंच्या भेटीनंतर धस मस्साजोगमध्ये, देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट; सुरेश धस पुन्हा विश्वास संपादित करणार?

Beed Politics : धनंजय मुंडेंसोबत भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी ठरलेले धस देशमुख कुटुंबीयांचा पुन्हा विश्वास संपादित करण्यासाठी थेट मस्साजोगला गेले. तिथे धस आणि देशमुख कुटुंबीयांसोबत काय घडलं? मस्साजोगला जाताना धसांना कुणी अडवलं? यावरचा हा विशेष रिपोर्ट

Tanmay Tillu

Beed Political News : काळे झेंडे दाखवून सुरेश धसांविरोधात मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे आणि परळीची बदनामी सुरेश धस यांनी केलीये. ती त्यांनी थांबवावी अशी मुंडे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे मुंडे आणि धसांच्या भेटीनंतर प्रकरणावर पडदा पडण्याऐवजी दोन्ही बाजुकडून विरोधाला अधिकच धार आलीये..

दुसरीकडे, धनंजय मुंडेंच्या भेटीनं टीकेचे धनी ठरलेल्या धसांनी मस्साजोग ग्रामस्थांचा आणि मराठा समाजाचा विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलीस अधिकारी महाजन आणि पाटील या प्रकरणात सहभागी आहेत. त्यांना सहआरोपी करणं आवश्यक असल्याची मागणी धसांनी केलीय.

संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी आमदार सुरेश धसांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची बातमी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांना दिली. त्यामुळे धसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं.

सुरेश धस केसानं गळा कापल्याची टीका होऊ लागली. त्यामुळे धसांनी आता सावध पवित्रा घेत मस्साजोगमध्ये जाऊन पुन्हा विरोधाची धार तीव्र केलीये. आता हा विरोध केवळ स्वतःची छबी वाचवण्यासाठी धस करतायत की खरंच यातून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळतो हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT