Sunil Tatkare reply to Rohit Pawar  Saam TV marathi
महाराष्ट्र

Rohit Pawar : महाभागालाच NCP पक्ष ताब्यात घ्यायचा होता, तटकरेंकडून अप्रत्यक्ष रोहित पवारांचा डोमकावळा म्हणून उल्लेख

Maharashtra politics : रोहित पवार यांच्या आरोपांना सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद आणखी तीव्र झाला आहे. पक्ष ताब्यात घेण्याच्या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे.

Namdeo Kumbhar

Sunil Tatkare reply to Rohit Pawar allegations : "रोहित पवार यांनी स्वतःच्या पक्षात काय सुरू आहे, ते आधी पाहावे. त्यांना ५० माणसेही जोडता आली नाहीत, त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षाबद्दल बोलणे थांबवावे," असा इशारा सुनील तटकरे यांनी दिला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना त्यांनी यावेळी सडेतोड उत्तर दिले. तटकरे यांनी रोहित पवार यांचा उल्लेख 'महाभाग' आणि 'डोमकावळा' असा केला. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत बदल करून पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता. या आरोपाचा तटकरेंनी समाचार घेतला.

तटकरे म्हणाले, "काही 'डोमकावळे' आमच्या पक्षात डोकावत आहेत. उलट, पक्ष ताब्यात घेण्याची घाई त्यांचाच (रोहित पवार) प्रयत्न होता. दादांच्या (अजित पवार) अपघातानंतर काय झाले, याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. या महाभागालाच राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घ्यायचा होता." तसेच, सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा आहे; मात्र वहिनी अध्यक्ष झाल्यापासून अनेक 'डोमकावळे' पक्षात डोकावत आहेत, असेही ते म्हणाले.

"अजित पवार सोबत असताना अनेक कटकारस्थाने केली गेली. अजित पवारांनी पक्ष चोरला, असे ते म्हणत होते, पण प्रत्यक्षात त्यांनाच पक्ष बळकावायचा होता. २०१४ पासून मला लक्ष्य केले जात आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी रोहित पवार माझ्यावर आरोप करत आहेत, त्यामुळे त्यांनी पक्षावर बोलणे थांबवावे," असे टीकास्त्र सुनील तटकरे यांनी सोडले. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांच्याकडून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर काही 'डोमकावळे' आमच्या पक्षात लक्ष घालण्याचे काम करत आहेत. रोहित पवार यांनी आधी आपल्या पक्षात काय सुरू आहे, ते पाहावे, असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला. काहींना आता आमच्या पक्षाबद्दल खूपच काळजी वाटू लागली आहे. दादा असतानाही मला अनेकवेळा लक्ष्य (Target) केले गेले आणि २०१४ नंतर तर हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. दादांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि आजही आहे, म्हणूनच मला लक्ष्य केले जात आहे, असे तटकरे म्हणाले.

देवगिरी बंगल्यावर झालेल्या संध्याकाळच्या बैठकीला मी उपस्थित होतो. रायगड, कोल्हापूर आणि पुणे जिल्हा परिषदेत भविष्यात काय करायचे आहे, याबद्दल मी माझी स्पष्ट भूमिका मांडली. तसेच 'डिलिमिटेशन' (मतदारसंघ पुनर्रचना) आणि महिला आरक्षण अंमलबजावणी यावरही सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते, असेही तटकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT