या दोन महिलांना बघितलंत का? १० वर्षांपासून बेकायदा वास्तव्य; ATS ने धाड टाकली अन् खरा चेहरा झाला उघड

illegal immigrants Mumbai : मुंबईतील कलिना परिसरात वाकोला पोलिसांनी दोन युगांडाच्या महिलांना बेकायदेशीर वास्तव्य प्रकरणात ताब्यात घेतले आहे. व्हिसा कालबाह्य झाल्यानंतर भारतात राहत असल्याचे समोर आले असून हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Mumbai Police Detain Two Ugandan Women
Mumbai Police Detain Two Ugandan WomenSaam
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Ugandan women detained in Mumbai illegal stay case : मुंबईतील सांताक्रूझ (पूर्व) येथील कलिना परिसरात वाकोला पोलिसांनी कारवाई करत, भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या युगांडाच्या दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

कलिना येथील फातिमा हाऊस परिसरात दोन विदेशी महिला संशयास्पदरीत्या राहत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे वाकोला पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून संबंधित महिलांची चौकशी केली.

चौकशीदरम्यान नाकायोंडो रोझ (वय ३७) आणि केमिगिसा प्रोस्कोव्हिया (वय २६) अशी त्यांची नावे निष्पन्न झाली असून, त्या युगांडाच्या नागरिक असल्याचे समोर आले. त्यांच्या पासपोर्ट आणि व्हिसाची तपासणी केली असता, त्यांचा व्हिसा बराच काळ आधीच कालबाह्य झाल्याचे आढळले. कोणतीही वैध परवानगी न घेता त्या भारतात बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Mumbai Police Detain Two Ugandan Women
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचं थेट निवडणूक आयोगाला पत्र; तटकरे-पटेलांच्या वर्चस्वाला धक्का?

पोलिसांनी दोन्ही महिलांचे पासपोर्ट आणि नागरिकत्वाची कागदपत्रे जप्त केली असून, त्यांना कायदेशीर प्रक्रियेनुसार हद्दपार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू केली आहे. यासंदर्भात परकीय नागरिक नोंदणी अधिकारी (FRRO) तसेच गुन्हे शाखेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.

Mumbai Police Detain Two Ugandan Women
Kharat Case : मुख्यमंत्री फडणवीसांची खुर्ची घालवण्यासाठी अघोरी पूजा; ३८ आमदारांनी खरातकडे बोट कापलं, महाराष्ट्राला हादरवणारे दावे

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग), मनीष कलवानिया (पोलीस उपायुक्त, परिमंडळ ८), साहाय्यक पोलीस आयुक्त (वाकोला विभाग) तसेच प्रकाश खांडेकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकोला पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक (मपोनि) योगिता तराळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक तळेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक घाडगे, महिला पोलीस शिपाई माने आणि दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

Mumbai Police Detain Two Ugandan Women
Kharat Case : जयंत पाटलांनी रक्ताने अंघोळ केली, नरबळी दिला का? भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com