Hingoli, Zilla Parishad School, khichadi
Hingoli, Zilla Parishad School, khichadi saam tv
महाराष्ट्र

Mid Day Meal : उंदराच्या लेंड्या, अळ्यांसह खिचडी खाऊ घातली, ग्रामस्थांचा आराेप; विद्यार्थी रुग्णालयात दाखल

संदीप नांगरे

Mid Day Meal : हिंगोली जिल्ह्यातील कंडोळी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिजविण्यात आलेल्या खिचडीत अळ्या आढळल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. या शाळेतील काही मुलांना उलटी हाेऊ लागल्याने रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहारात आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील महिला व नागरिकांनी या शाळेच्या आवारात मोठी गर्दी करीत शिक्षक व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. या शाळेतील जवळपास २५ ते ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. या गंभीर प्रकारामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.

कडोळीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने त्यांना उलटी व मळमळ ही लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींचा सामावेश आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकाकडून विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. घटनास्थळी गोरेगाव येथील पोलीस दाखल झाले. मात्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य न घेता वेळकाढूपणा केल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

२५ ते ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून सदरील घटनेची माहिती घेण्यासाठी सेनगाव तालुका शिक्षण अधिकारी श्री गव्हाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन आऊट ऑफ कव्हरेज दाखवत होता. त्यामुळे त्यांना देखील ही घटना माहीत आहे की नाही. यावर प्रश्न उपस्थित होत आहे.

घडलेल्या प्रकाराला शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक व शिक्षण विभाग हे जबाबदार असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या ठिकाणी गावातील महिला व नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी करून संताप व्यक्त केला जात आहे.

त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैनिक यांच्यासह शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशीनंतर संबंधित प्रकारात दाेषींवर कठोर कारवाई केली जाईल असे ग्रामस्थांनी (villagers) संजय दैनिक यांनी आश्वासित केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात धंगेकरानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

Amla Benefits: मधुमेहींसाठी आवळा ठरेल रामबाण उपाय; फायदे एकदा वाचा

Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा

Amravati: गढूळ पाण्यावरुन वडनेर गंगाई ग्रामस्थांचा दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयावर राेष, उपविभागीय अभियंत्यांना दिला इशारा

Uddhav Thackeray : भाजप आरएसएसवर बंदी आणेल; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर बाण

SCROLL FOR NEXT