Jitendra Awhad : प्रचाराला जितेंद्र आव्हाडांची गरज लागणारच आहे ! आव्हाडांचा स्वकीयांना इशारा (पाहा व्हिडिओ)

आमदार जितेंद्र आव्हाड संतप्त झालेले पहायला मिळाले.
jitendra awhad, ncp
jitendra awhad, ncpsaam tv

- सिद्धेश म्हात्रे

Jitendra Awhad News : प्रचाराला माझी गरज लागणार आहे हे लक्षात असू द्या असा सज्जड दमच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी आपल्याच पक्षातील नगरसेवकांना दिला आहे. आगरी कोळी महोत्सवाच्या उदघाटनाच्या भाषणात आव्हाड यांनी कार्यक्रमास अनुपस्थित राहिलेल्या एनसीपीच्या (ncp) नगरसेवकांचा समाचार घेतला. (Maharashtra News)

jitendra awhad, ncp
Thane Breaking News : बॅरिकेटिंग अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू; कॅडबरी सिग्नल परिसरातील घटना

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे नवी मुंबईतील (navi mumbai) आगरी कोळी महोत्सवाच्या उदघाटनासाठी आले होते. यावेळी त्यांच्या भेटीसाठी नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड संतप्त झालेले पहायला मिळाले.

jitendra awhad, ncp
Pune News : 31 डिसेंबरच्या रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनीला छेडले, गुन्हा दाखल

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईत केवळ तीन नगरसेवक आहेत. त्यातील एक महिला आहे. त्या जिल्हाध्यक्षा पदावर असताना देखील कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले हाेते. जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाषणातून तीव्र नाराजी व्यक्त केली.

jitendra awhad, ncp
Cyrus Mistry Car Accident : सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी चार्जशिट दाखल, 'मर्सिडीज' च्या अहवालात पंडाेल यांनी...,

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Latest Marathi News) म्हणाले न आलेल्या नगरसेवकांना निराेप द्या येत जा कार्यक्रमाला. मी आणि आनंद परांजपे येथे येणार आहाेत हे माहिती हाेते ना. आणि नगरसेवकांनी दांडी मारायच्या हे याेग्य नाही असेही आव्हान म्हणाले. प्रचाराला माझी गरज लागणार आहे असा सज्जड दमच आव्हाडांनी कार्यक्रमास गैरहजर असलेल्या नगरसेवकांना दिला. दरम्यान पुढील काळात उरलेले तीन नगरसेवक पक्षात राहणार की पक्षांतर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com