Cyrus Mistry Accident : उद्योजक सायरस मिस्त्री (cyrus mistry) यांच्यासोबत कारमध्ये असलेल्या अनाहिता पंडाेल (anahita pandole) यांच्यावर निष्काळजीपणाने अति वेगाने कार चालवण्याचा ठपका ठेवत पाेलिसांनी न्यायालयात दाेषाराेप पत्र दाखल केले आहे. दरम्यान मर्सिडीज-बेंझ कंपनीने संबंधित वाहनातून घेतलेल्या इव्हेंट डेटा रेकॉर्डर (EDR) वरुन तयार केलेल्या (तांत्रिक विश्लेषण) अहवालात डॉ. अनाहिता या वाहनाचा वेळेत ब्रेक लावू शकल्या नाहीत असे म्हटलं आहे. (Breaking News Marathi)
उद्योजक सायरस मिस्त्री आणि त्यांच्या एका साथीदाराच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कासा पोलिसांकडून न्यायालयात दाेषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. सुमारे 152 पानांचे हे दाेषाराेप पत्र आहे. यामध्ये आठ प्रत्यक्षदर्शींचे जबाब नाेंदविला आहे. त्यात पंडाेल यांच्या पतीसह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे (rto) अधिकारी, मर्सिडीज-बेंझ कंपनीचा अहवाल आदींचा समावेश आहे. (Maharashtra News)
हा अपघात गतवर्षी चार सप्टेंबरला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी जवळील सूर्या नदीच्या पुलाला धडकून झाला होता. या अपघातात (accident) सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला तर चालक पंडोल आणि एक जण गंभीर जखमी झाले होते.
त्यादिवसापासून पंडाेल या रुग्णालयात उपचार घेताहेत. त्यांच्यावर अद्याप अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. न्यायालयात (court) दाेषाराेपत्र दाखल झाल्याने आगामी काळात पंडाेल यांच्यावर न्यायालयात उपस्थितीत राहण्याबाबतची सूचना केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.