Cyrus Mistry Accident : सायरस मिस्त्री (cyrus mistry) यांच्यासोबत कारमध्ये असलेल्या अनाहिता पंडाेल (anahita pandole) यांनी अनेक वेळा वाहन वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याची माहिती समाेर आली आहे. अपघाताच्या दिवशी देखील अनाहिता यांच्याकडून कार चालवताना अनेकदा वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. (Breaking Marathi News)
चार सप्टेंबरला मिस्त्री यांचा पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीच्या पुलावर त्याची कार रेलिंगला धडकल्याने मृत्यू झाला होता. या अपघातात पंडाेल या गंभीर जखमी झाल्या हाेत्या. आजही त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात (hospital) उपचार करण्यात येत आहेत.
पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर पाेलिसांनी केलेल्या तपासात कार चालक अनहिता पंडोल यांनी भरधाव वेगात कार चालवल्याप्रकरणी अनेक वेळा दंड भरला आहे. अनहिता पंडोल आणि अपघातग्रस्त कार नावावर असलेल्या जेएम फायनान्शिअल कंपनीला पालघर आणि मुंबई पोलिसांनी अनेक वेळा वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड (fine) ठोठावला आहे.
दरम्यान अपघाताच्या दिवशी एक दोन वेळा नाही तर तब्बल सात वेळा पंडोल यांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याची उघड झाले आहे. त्याप्रकरणी त्यांना दंड भरावा लागला असल्याच पालघर पोलिसांनी स्पष्ट केले.
या अपघातातून बचावलेल्या डॉ. अनाहिता यांच्यावर दक्षिण मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध पालघर पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. यामध्ये भारतीय दंड संहिता (IPC) मधील कलम 304(A) तसेच 279 (सार्वजनिक रस्त्यावर जास्त वेगाने वाहन चालवणे) आणि 337 (इतरांचा जीव आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात घालून मृत्यू ओढवणे) यांचा समावेश आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.