Sharad Pawar Satara News : रयत शिक्षण संस्था आगामी काळात आयबीएम (IBM) या कंपनीशी करार करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रीम बद्धीमत्ता़) ज्ञान घेण्याची सुविधा उपलब्ध करेल अशी ग्वाही रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन आणि रयतमधील पन्नास वर्षेचे योगदानाबद्धल आज (बुधवार) रयत शिक्षण संस्थेने पवार यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी पवार बाेलत हाेते. (Maharashtra News)
पवार म्हणाले कर्मवीरांनी तळागळात शिक्षण पोहचविले. रयत शिक्षण संस्था आता वेगळ्या वळणावर आहे. जगातल्या बदलांची नोंद घेऊन त्या प्रमाणे शिक्षण देण्याची आज आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करीत पवार यांनी रयतच्या पुढील वाटचालीबाबत भाष्य केले.
ते म्हणाले जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या आयबीएमशी करार करून आरटीफिशियल इंटेलिजन्सचे ज्ञान घेण्याची सुविधा रयत उपलब्ध करणार आहे. हा विषय नेहमीच्या शिक्षणाबरोबर नोकरीची हमी देणार असेल. जे विद्यार्थी (students) दहावी, बारावी होत आहेत त्यांनी हा विषयही घ्यावा असा सल्ला पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंबॉयसिसचे डॉ. शा. ब. मुजुमदार, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष ॲड. भगिरथ शिंदे, सचिवल प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव प्राचार्य राजेंद्र साळुंखे, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिदे, मॅनेजिंग कौंन्सीलचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.