Satara News : 'अजित पवारांनी आत्मक्लेश करावा'

आज भाजपच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विराेधात निदर्शने करण्यात आली.
Ajit Pawar, Chhatrapati Sambhaji Maharaj, BJP, Satara, Karad
Ajit Pawar, Chhatrapati Sambhaji Maharaj, BJP, Satara, Karadsaam tv
Published On

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार, जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांनी महापुरुषांबाबत (Chhatrapati Sambhaji Maharaj) केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ भाजपने आज कराड येथे रास्ता राेकाे आंदाेलन केले. आंदाेलकांनी कराड -उंब्रज रस्ता रोखून निदर्शने आंदोलन करण्यात आले. (Satara Latest Marathi News)

आंदोलकांनी गाढवांचा गळ्यात तिन्ही नेत्यांचे फोटो लावून प्रतिकात्मक मिरवणूक काढली. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत अजित पवार यांनी माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी मागणी केली. जर माफी व राजीनामा न दिल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे (bjp) प्रदेश सरचिटणीस विक्रम पावसकर यांनी दिला.

विक्रम पावसकर म्हणाले राष्ट्रवादीचे नेते महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करीत आहेत. अजित पवार यांनी आत्मक्लेश करावा असेही पावसकर यांनी नमूद केले. धरणवीर आणि माैलवी असे हे दाेन नेते (अजित पवार, जितेंद्र आव्हाड) असल्याचे सांगत ते शेण खाऊन वक्तव्य करीत आहेत अशी जहरी टीका पावसकर यांनी केली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Ajit Pawar, Chhatrapati Sambhaji Maharaj, BJP, Satara, Karad
Sharad Pawar : महाराष्ट्रातील भाजपच्या 'मिशन ४५' वर शरद पवारांनी भाजपाध्यक्ष नड्डांना करुन दिली 'ही' आठवण
Ajit Pawar, Chhatrapati Sambhaji Maharaj, BJP, Satara, Karad
Chhatrapati Sambhaji Maharaj : मी ब्राह्मणांबद्दल बोलत नाही पण..., : छगन भुजबळ
Ajit Pawar, Chhatrapati Sambhaji Maharaj, BJP, Satara, Karad
Dhananjay Munde Car Accident : धनंजय मुंडेंच्या कारला अपघात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com