Jejuri Saam tv
महाराष्ट्र

Malhar Certificate: 'मल्हार' सर्टिफिकेशनला जेजुरीकरांचा विरोध, थेट आंदोलनाचा दिला इशारा

JeJuri Khandoba Temple: मांस , मटण किंवा मद्य विक्रीच्या योजनेला 'मल्हार सर्टिफिकेशन' नाव देण्याबाबतच्या मंत्री नितेश राणे यांच्या निर्णयाला जेजुरीकरांनी विरोध केला आहे. जेजुरीच्या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Priya More

साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरच्या मल्हारीचं नाव आता मल्हार झटका मटण असं दिले जात असल्यामुळे राज्यातील सर्व मल्हार भक्तांमध्ये तीव्र संताप आहे. देवाच्या नावाने मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याला आता जेजुरीकरांनी देखील विरोध केला आहे.

'जेजुरीच्या खंडेरायाला 'जय मल्हार' असे भावभक्तीने म्हटले जाते आणि तोच जयघोष आहे. मात्र या नावाने मांस , मटण किंवा मद्य विक्रीच्या योजनेला 'मल्हार सर्टिफिकेशन' नाव देणे किंवा त्या नावाचे समर्थन, स्वागत करणे पूर्णपणे अयोग्य आहे.', असे मत माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.

तसंच,'मल्हार नाव मटण, मास योजनेसाठी वापरण्यास आमचा तीव्र विरोध आहे. शासनाने हे नाव बदलले नाही तर वेळ आल्यास जेजुरीकरांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करू.', असा इशारा देखील वीणा सोनवणे यांनी दिला आहे. भाविकांच्या भावना दुखावण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे याबाबत लवकरच धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाद मागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

देवताच्या नावाने मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या मंत्री नितेश राणे यांच्या घोषणेला जेजुरी मार्तंड देवस्थानाच्या काही सदस्यांनी विरोध केला आहे. तर देवस्थानाच्या ५ सदस्यांनी राणेंच्या निर्णयाला पाठिंबादिला. खंडोबाला पुरणपोळीचा नैवेद्य असतो, आमचा देव शाकाहारी असून ‘मल्हार’ नावाने मटण दुकानांना सर्टिफिकेट देऊ नये, अशी विनंती देवस्थानच्या सदस्यांनी केली आहे. सध्या राज्यामध्ये मल्हार सर्टिफिकेटचा वाद चांगलाच पेटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: खुशखबर! रेल्वेत नोकरीची संधी; ११४९ रिक्त जागांवर भरती; आजच करा अर्ज

Prostate Cancer Early Signs: ही ५ लक्षणं दिसली तर समजा प्रोस्टेट कॅन्सर होणारे; पुरुषांनी त्वरित घ्यावी डॉक्टरांची मदत

Zubeen Garg: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध संगीतकाराला अटक, मॅनेजरच्या घरावरही छापेमारी

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

SCROLL FOR NEXT