Malhar certificate : अभिनेते संदीप कुलकर्णी यांचा 'मल्हार' प्रमाणपत्राला विरोध, कारण सांगताना म्हणाले...

Sandeep Kulkarni : सध्या सर्वत्र 'मल्हार' प्रमाणपत्राची चर्चा पाहायला मिळत आहे. अशात आता अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी 'मल्हार' प्रमाणपत्राला विरोध दर्शवला आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात.
Sandeep Kulkarni
Malhar certificate SAAM TV
Published On

महाराष्ट्रात सध्या 'मल्हार प्रमाणपत्र' (Malhar certificate) असे नवीन प्रमाण प्रत्र देण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरूवात मंत्री नितेश राणे यांनी सुरू केली आहे. अशात आता मराठी अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी खंडोबा गडाला भेट दिली आहे. प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी (Sandeep Kulkarni) यांनी कुलदैवत खंडोबा या देवताचे दर्शन घेतले. तेथे जाणून त्यांनी अभिषेक केला. संदीप कुलकर्णी यांनी खंडोबा देवताचे मल्हार नाम अयोग्य गोष्टी करीता वापरले जात असल्याचा खेद व्यक्त करीत विरोध दर्शविला आहे.

या प्रसंगी जेजुरी मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त डॉ राजेंद्र खेडकर यांनी सर्वप्रथम मल्हार नामकरणास विरोध दर्शविला होता. यावेळी उद्योजक राहुल निकम, बाल टीव्ही कलाकार दर्श आणि श्री उपस्तिथ होते. आता ग्रामस्थ खान्देकरी मानकरी यांनी ही विरोध दर्शविला आहे. कुलकर्णी यांनी गडावरील इतिहासिक तलवारीचे दर्शन घेता हा अनमोल शस्त्र ठेवा आपली राष्ट्रीय संपत्ती असून याचे जतन योग्य पद्धतीने केले जाण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

संदीप कुलकर्णी 'मल्हार' प्रमाणपत्राला विरोध करत म्हणाले की, "मल्हार मटण शॉप कधी असू नये. कारण जेजुरी हे शंकर आणि पार्वतीचे स्थान आहे. शंकराला मांसाहार कधीच पसंत नाही. त्यामुळे त्या नावाने मटण शॉप नसावे. चांगल्या आधुनिक गोष्टीसाठी मल्हार हे नाव वापरा. "

Sandeep Kulkarni
HBD Alia Bhatt : आलिया भट्ट की रणबीर कपूर कोण आहे कोट्यधीश? आकडा वाचून डोळे भिरभिरतील

मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय?

मंत्री नितीश राणे यांनी 10 मार्च रोजी महाराष्ट्रात मल्हार प्रमाण नावाचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रातील झटका मांस दुकानांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. आता महाराष्ट्रातील मांस दुकानांची नोंदणी मल्हार प्रमाणपत्राद्वारे केली जाणार आहे. नितेश राणे यांनी सांगितले की, मल्हार प्रमाणपत्र उपलब्ध असलेल्या नोंदणीकृत दुकानातूनच मांस विकत घ्यावे.

संदीप कुलकर्णी करिअर

अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाने आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. संदीप कुलकर्णी हे स्पष्ट वक्ता अभिनेता आहे.

Sandeep Kulkarni
Tamannaah-Vijay : विजय-तमन्नाचं पॅचअप? रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com