काल (14 मार्च) सर्वत्र होळीचा (Holi 2025 Celebration) उत्साह पाहायला मिळत होता. सर्वजण होळीच्या रंगात रंगताना पाहायला मिळाले. सेलिब्रिटींनी होळी पार्टीचे आयोजन केले होते. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) देखील आपल्या घरी धमाकेदार होळी पार्टीचे आयोजन केले होते. या होळी पार्टीला चक्क अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) पाहायला मिळाले. ते दोघेही रवीना टंडनच्या घरची होळी पार्टीत सहभागी झाले होते. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांना रवीना टंडनच्या घरी होळीला जाताना स्पॉट करण्यात आले. आधी रवीना टंडनच्या घरी तमन्ना भाटिया पोहचली त्यानंतर पाठोपाठ विजय वर्मा देखील पोहचला. या दोघांना पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले. ब्रेकअपच्या चर्चांनंतर पहिल्यांदाच तमन्ना आणि विजयला एका ठिकाणी स्पॉट करण्यात आले. दोघांनी एकत्र होळी साजरी केली. यावरून यांच्यातील दुरावा कमी झाला असून आता लवकरच ही जोडी पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीचरंगली आहे.
अलिकडेच तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा वेगळे झाल्याची बातमी समोर आली होती. त्यांनी प्रेमाचे नाते संपवून मैत्रीचा हात पुढे केला आहे. तमन्ना आणि विजयचा ब्रेकअप एकमेकांच्या सहमतीने झाला आहे. तमन्ना आणि विजय गेल्या दोन वर्षांपासून डेट करत होते.दोघे कायम एकत्र स्पॉट होत होते. तमन्ना आणि विजयच्या अफेरच्या चर्चा 'लस्ट स्टोरीज २' या वेब सीरिजपासून रंगल्या होत्या. त्यानंतर यांनी एकमेकांना डेट करत असल्याचे कबूल केले.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या लग्नाची चर्चा सुरू असताना त्यांच्या ब्रेकअपची माहिती समोर आली. तमन्ना भाटियाला 'स्त्री २'मधील 'आज की रात' या गाण्यामुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. अलिकडेच 29 नोव्हेंबर 2024ला तमन्ना भाटियाचा 'सिकंदर का मुकद्दर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर विजय वर्माची 'IC 814 -द कंदहार हायजॅक' सीरिज खूपच गाजली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.