Bharat Jadhav
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कारण त्यांच्या ब्रेकअपची चर्चा आहे.
या दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटो डिलीट केले आहेत आणि ब्रेकअप केले आहे.
दरम्यान दोघांनी ब्रेकअपबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाहीये. याच दरम्यान आपण दोघांपैकी कोणाकडे जास्त संपत्ती आहे, जाणून घेऊ
सोशल मीडियावर या दोघांची कमाई आणि एकूण संपत्तीची चर्चा रंगली आहे. दोघांच्या नेट वर्थमध्ये खूप फरक आहे.
तमन्नाने 2005 मध्ये 'चांद सा रोशन चेहरा' या हिंदी चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्याच वर्षी विजयने तेलुगू सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
साऊथ सिनेमानंतर तमन्नाने बॉलिवूडमध्येही चांगले नाव कमावले. विजय वर्माही प्रसिद्ध अभिनेता आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार तमन्ना भाटियाची संपत्ती १२० कोटी रुपये आहे.
कोइमोईच्या अहवालानुसार, विजयची एकूण संपत्ती 20 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो ८५ लाख ते १ कोटी रुपये मानधन घेतो.