बॉलिवूडची सुपरस्टार आणि कपूर कुटुंबाची सून आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचा आज वाढदिवस आहे. आलिया भट्ट आज 32 वर्षांची झाली आहे. आलिया भट्टने 'स्टुडंट ऑफ द इअर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आलिया निर्माते महेश भट्ट यांची मुलगी आहे. आलियाने 2022 मध्ये बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीर यांना एक लेक आहे. त्यांच्या लेकीचे नाव राहा आहे. आलिया आणि रणबीर सर्वात श्रीमंत कोण? जाणून घेऊयात.
बर्थडे गर्ल अभिनेत्री आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आलिया चित्रपटांसोबत जाहिराती आणि ब्रँडमधून पैसा कमावते. आलिया भट्ट एका चित्रपटासाठी जवळपास 10 ते 20 कोटी रुपये घेते. तर एका जाहिरातीतून आलिया जवळपास 9 ते 10 कोटी रुपये कमावते. आलिया 'इटरनल सनशाइन प्रोडक्शन' देखील चालवते. ज्यातून ती कोटींमध्ये कमावते.
ब्रॅण्ड ॲम्बेसेडरमधून देखील आलियाला खूप पैसा येतो. ती अनेक फॅशन बँडसोबत कनेक्ट आहे. आलियाकडे अनेक लग्जरी कार देखील आहेत. यात लँड रोव्हरची, बीएमडब्ल्यू आणि ऑडी अशा लग्जरी कारचा समावेश आहे. आलिया भट्टचे स्वतःचे लंडनमध्ये घर आहे. ज्याची किंमत जवळपास 25-30 कोटी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आलिया भट्ट जवळपास 550 कोटी रुपयांची मालकीण आहे.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) एक आलिशान लाइफ जगत आहे. तो चित्रपटांसोबत जाहिराती आणि ब्रँडमधून पैसा कमावतो. रणबीर कपूर एका चित्रपटासाठी जवळपास 7 कोटी रुपये मानधन घेतो. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या बंगल्यात राहतात. ज्याची किंमत जवळपास 250 कोटी रुपये आहे. रणबीर कपूरकडे पुण्यात स्वतःचे लग्जरी अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत कोटींमध्ये आहे.
रणबीरकडे आलिशान गाड्या आहेत. ज्यांची किंमत कोटींच्या घरात आहे. मर्सिडीज , रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू आणि ऑडी अशा लग्जरी कार आहेत. रणबीर कपूर एका ब्रँडच्या जाहिरातीतून तब्बल 6 ते 8 कोटी रुपये कमावतो. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूर जवळपास 345 कोटी रुपयांचा मालक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.