Namastey London Re-release: अक्षय-कतरिनाचा नमस्ते लंडन चित्रपट होणार रि-रिलीज; जाणून घ्या कोणत्या तारखेला होणार प्रदर्शित

Namastey London Movie: 'सनम तेरी कसम' चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनानंतर, अक्षय कुमारचा 'नमस्ते लंडन' हा चित्रपट देखील पुन्हा प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या पुन्हा रिलीजची बातमी ऐकून चाहते उत्सुक आहेत.
Namastey London Re-release
Namastey London Re-releaseSaam Tv
Published On

Namastey London Re-release: हर्षवर्धन राणे आणि मावरा हुसेन यांचा 'सनम तेरी कसम' हा चित्रपट गेल्या महिन्यापूर्वी पुन्हा प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने ₹३३ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची जबरदस्त कमाई पाहून, इतर अनेक चित्रपट निर्मातेही जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करत आहेत. आता लवकरच अक्षय कुमार आणि कटरिना कैफच्या 'नमस्ते लंडन' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.

या तारखेला नमस्ते लंडन पुन्हा प्रदर्शित होईल

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा 'नमस्ते लंडन' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. हा चित्रपट होळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. अक्षयने X वर याबद्दल माहिती दिली आहे. अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'नमस्ते लंडन' हा चित्रपट १४ मार्च रोजी होळीच्या दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

Namastey London Re-release
Kankadhish Movie: कोकणातील सद्गुरु भालचंद्र महाराजांची गाथा रुपेरी पडद्यावर; ‘कणकाधीश’ चित्रपटाची घोषणा

'नमस्ते लंडन' आधीच हिट आहे.

'नमस्ते लंडन' हा चित्रपट आधीच हिट झाला आहे. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपटाने ३७.३९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. अलिकडच्या काळात 'हम आपके हैं कौन', 'दिल तो पागल है', 'लैला मजनू' आणि इतर अनेक चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाले आहेत. यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर काहींना नाही.

Namastey London Re-release
Nehal Chudasama: महिला दिनापूर्वी मुंबईत धक्कादायक घटना; मिस युनिव्हर्स फेम अभिनेत्रीवर हल्ला

चित्रपटाची कथा काय आहे?

'नमस्ते लंडन'ची कथा लंडनमध्ये वाढणाऱ्या एका भारतीय मुलीची आहे. तिच्या वडिलांची इच्छा आहे की तिने भारतात लग्न करावे आणि भारतात यावे. ती तसं करते पण एकदा ती लंडनला गेली की, ती तिच्या लग्नाबद्दल विसरते. मग भारतातील एक मुलगा (अक्षय कुमार) त्याच्या पद्धतीने कतरिनावर प्रेम करून तिला भारतात आणण्याचा प्रयत्न करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com