Somvati Amavasya Yatra 2024 : यळकोट यळकोट जय मल्हार..., सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर भाविकांची अलाेट गर्दी

Jejuri Khandoba : कऱ्हा नदीवरील रंभाई शिंपीन या ठिकाणी श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींना सायंकाळी पाच वाजता कऱ्हा नदीच्या पाण्याने व पंचामृताने स्नान घालून समाज आरती हाेईल.
somvati amavasya 2024 devotess gathered in thousand numbers jejuri
somvati amavasya 2024 devotess gathered in thousand numbers jejurisaam tv

Jejuri :

महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रेला सुरुवात झाली. देवाचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी जेजुरी गडावरून करा नदीकडे मार्गस्थ झाला आहे. येळकोट येळकोट जय मल्हार ! असा जयघोष करीत भाविकांनी भंडाऱ्याचे उधळण केली. यावेळी संपूर्ण जेजुरीगड भंडाऱ्याने नाहून निघाला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोमवती या दिवशी पर्व काळाची संधी असल्याने जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळा कऱ्हा नदीवर प्रस्थान ठेवत असतो. मंदिर प्रदक्षणीनंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली.

somvati amavasya 2024 devotess gathered in thousand numbers jejuri
Voter Awareness : मतदान जागृतीसाठी वासुदेवच्या रुपात शिक्षकाचा प्रचार, नाशिकसह धुळ्यात विद्यार्थ्यांची रॅली

गडावरून सोहळा निघताच हजारो भाविकांनी देवाचे लेन असणाऱ्या पिवळा गर्द भंडाऱ्याची उधन करीत खंडेरायाचा जयघोष केला. यावेळी देवस्थान विश्वस्तांस शहरातील अठरापगड जाती धर्मातील समाजबांधव ग्रामस्थ पुजारी ,सेवेकरी, मानकरी ,खांदेकरी यांनी हा सोहळा याची डोळा याची देहा अनुभवला. (Maharashtra News)

कऱ्हा नदीवरील रंभाई शिंपीन या ठिकाणी श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींना सायंकाळी पाच वाजता कऱ्हा नदीच्या पाण्याने व पंचामृताने स्नान घालून समाज आरती हाेईल.

Edited By : Siddharth Latkar

somvati amavasya 2024 devotess gathered in thousand numbers jejuri
Balumama Palkhi Sohala: भंडाऱ्याची उधळण करत 'बाळूमामांच्या नावानं चांगभंल'च्या जयघोषात आदमापुरात पालखी सोहळा संपन्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com