Voter Awareness : मतदान जागृतीसाठी वासुदेवच्या रुपात शिक्षकाचा प्रचार, नाशिकसह धुळ्यात विद्यार्थ्यांची रॅली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने विविध उपक्रम राबविले जात आहेत.
voter awareness in nashik and dhule lok sabha election 2024
voter awareness in nashik and dhule lok sabha election 2024saam tv

- भूषण अहिरे / अजय साेनवणे

Lok Sabha Election 2024 :

मतदानाची टक्केवारी वाढावी नागरीकांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. नाशिक आणि धुळे जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. नाशिक जिल्ह्यात शिक्षकांनी वासुदेवाची भूमिका साकारत २० मे दिवशी होणा-या लोकसभा निवडणूकीत निर्भयपणे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे आवाहन केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकच्या देवळा तालूक्यातील लोहणेर येथील जनता महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी कलश फेरीतून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. शिवाय यात शाळेतील शिक्षकांनी वासुदेवाची भूमिका साकारत २० मेला होणा-या लोकसभा निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी निर्भयपणे मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्का बजवावा असे आवाहन वासूदेव यांनी केले.

voter awareness in nashik and dhule lok sabha election 2024
Nashik Crime News : वर्चस्वाच्या वादातून त्रिमूर्ती नगरमध्ये गाेळीबार, सहा युवकांना अटक (Video)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने धुळे जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत.

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज (साेमवार) मतदान जनजागृती रॅली काढून मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो असं म्हणत मतदारांना मतदान करण्यासंदर्भात जनजागृती केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी या जनजागृती रॅलीमध्ये मोठ्या संख्येने चिमुकले विद्यार्थी सहभागी झाल्याचे बघायला मिळाले आहे. तालक्यातील आर्णी जिल्हा परिषद मराठी शाळेच्या वतीने ही मतदान जागृती रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर लोकांना मतदान विषय माहिती देण्यात आली. यावेळी गावातील लोकप्रतिनिधींसह शाळेचे शिक्षक, शिक्षिका देखील या विद्यार्थ्यांसह मतदान जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले.

Edited By : Siddharth Latkar

voter awareness in nashik and dhule lok sabha election 2024
Parbhani Constituency: इफ्तार पार्टीला महादेव जानकर गेले नाहीत, महायुतीमधील एक गटाची ओढवली नाराजी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com