Jejuri Khandoba Devsthan : खंडोबा देवस्थानावर १० लाखाचे दागिने असलेली पर्स गहाळ; देवस्थान कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, दागिने केले परत

baramati News : देवदर्शन केल्यानंतर परत जात असताना गडाच्या मागील बाजूस असणाऱ्या स्वच्छतागृहात जाताना त्यांनी पर्स घोड्याच्या पागेच्या भिंतीवर ठेवली. जाताना पर्स विसरून महिला परिवारासह निघून गेल्या
baramati News
baramati NewsSaam tv
Published On

बारामती : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलेची पर्स गड परिसरात विसरून गेल्या होत्या. या पर्समध्ये दहा लाख रुपये किमतीचे सोने व रोख दहा हजार रुपये होते. श्री मार्तंड देवसंस्थानच्या कर्मचाऱ्यांना ही पर्स आढळून आली असता कर्मचाऱ्यांने प्रामाणिकपणा दाखवत सदर महिलेस आपले दागिने व पैसे परत मिळाले. 

चंद्रपूर जिल्ह्यातील सेवा निवृत्त प्राध्यापिका डॉ. सुधा माळधुरे या आपल्या परिवारासह कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर गेल्या होत्या. देवदर्शन केल्यानंतर परत जात असताना गडाच्या पाठी मागील बाजूस असणाऱ्या स्वच्छता गृहात जाताना त्यांनी स्वतः जवळची पर्स घोड्याच्या पागेच्या भिंतीवर ठेवली. मात्र जाताना ही पर्स विसरून या महिला आपल्या परिवारासह निघून गेल्या.

baramati News
Miraj News : पाण्याच्या बॉटल बॉक्सच्या आडून बनावट दारूची तस्करी; मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

भाविक होते अनभिज्ञ 

गडावर खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक पार्टीच्या मार्गाला लागले होते. या दरम्यान आपल्याजवळची पर्स गायब असल्याचे माळधुरे परिवाराच्या कल्पना देखील नव्हती. यामुळे ते आपल्याने गाडीने पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले होते. माळधुरे परिवार सासवडपर्यंत निघून गेले होते. याच दरम्यान सदरची पर्स देवस्थानावरील एका कर्मचाऱ्याला सापडली. 

baramati News
Nanded : पैनगंगा नदीतून गावकऱ्यांचा धोकादायक प्रवास; पुलाअभावी लाकडी तराफ्याचा वापर

पर्स सापडल्यानंतर कार्यालयात केली जमा 

जेजुरी देवसंस्थानचे कर्मचारी सुनील भोसले व बाळासाहेब पाठक यांना घोड्याच्या पागे जवळ सदरची पर्स आढळून आली. या दोघांनी ही पर्स देवसंस्थान कार्यालयात जमा केली. या बॅगेत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे आढळून आली. या कागदपत्रे, आयकार्डवर असणाऱ्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्यात आला. यानंतर भाविक परत जेजुरी गडावर आले असता त्यांना पर्स परत करण्यात आली. सुनील भोसले आणि बाळासाहेब पाठक यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक व अभिनंदन श्री मार्तंड देवसंस्थान प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त अँड पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, डॉ. राजेंद्र खेडेकर, पोपट खोमणे, अनिल सौंदडे, विश्वास पानसे व्यवस्थापक आशिष बाठे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com