Nanded : पैनगंगा नदीतून गावकऱ्यांचा धोकादायक प्रवास; पुलाअभावी लाकडी तराफ्याचा वापर

Nanded News : अनेक गावापर्यंत धड रस्ता देखील पोहचला नसल्याचे चित्र पाहण्यास मिळते. असाच काहीसा प्रकार मराठवाडा आणि विदर्भातील अनेक गावाच्या बाबतीत घडला असून येथील ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतो
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी
नांदेड
: मराठवाडा आणि विदर्भात येत असलेल्या दोन गावांमधून पैनगंगा नदी वाहत आहे. मात्र या नदीवर पूल नसल्याने नदी पार करण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याठिकाणी पुलास मंजुरी देण्यात आली आहे. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुलाचे काम रखडले आहे. परिणामी मागील अनेक वर्षांपासून नदी पार करण्यासाठी गावकरी लाकडी तराफ्याच्या साहाय्याने धोकादायक प्रवास करत आहे. 

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु अजूनही अनेक खेड्यापाड्यापर्यंत मूलभूत सुविधा पोहचल्या नाहीत. एकीकडे रस्त्याचे जाळे देशभरात मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे अनेक गावापर्यंत धड रस्ता देखील पोहचला नसल्याचे चित्र पाहण्यास मिळते. असाच काहीसा प्रकार मराठवाडा आणि विदर्भातील अनेक गावाच्या बाबतीत घडला असून येथील ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. 

Nanded News
Fake Notes : बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात अडकले; सराफासह तिघे पोलिसांच्या ताब्यात

२५ गावातील नागरिक करतात धोकेदायक प्रवास 

मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या या पैनगंगा नदीवरचा हा धोकादायक प्रवास पाहून थक्क होत आहे. मागील अनेक वर्षांपासून मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास २५ गावातील नागरिक या नदी पत्रातून एका लाकडी तराफ्याच्या साहाय्याने नदी पत्रातून धोकादायक प्रवास करत आहेत. मराठवाड्यातील हदगाव आणि विदर्भातील उमरखेड या दोन्ही शहरांना ये- जा करण्यासाठी जवळपास ४० किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत. परंतु या नदीवरून प्रवास केल्यास फक्त 5 किलो मीटर अंतरावर हे दोन्ही तालुक्याचे ठिकाण येतात. त्यामुळे या नदीवर पूल झाल्यास या २५ गावांचा प्रश्न सुटणार आहे. 

Nanded News
Miraj News : पाण्याच्या बॉटल बॉक्सच्या आडून बनावट दारूची तस्करी; मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुलास मंजुरी पण काम रखडले 

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नदीवर पूल उभारण्यास मंजुरी दिली होती. यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या पुलाच्या बांधकामाचे काम रखडले आहे. यामुळे या गावकऱ्यांना पुन्हा तराफ्याच्या साहाय्याने असा धोकादायक प्रवास करावा लागतो आहे. या धोकेदायक प्रवास कधी थांबणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com