solapur saam tv
महाराष्ट्र

Solapur Crime News : प्रमोद गायकवाड हा सोलापूरचा वाल्मीक कराड; तरुणाच्या हत्येनंतर नागरिकांकडून संताप

Solapur Crime News in Marathi : सोलापुरातील वैभाव वाघे हत्या प्रकरणावरून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला. यावेळी आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण सर्वत्र गाजत आहे. बीडच्या सरपंचाचं हत्या प्रकरण ताजं असताना सोलापूरमध्येही एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या हत्येच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी कॅन्डल मार्च काढत संताप व्यक्त केला. या हत्याकांडातील आरोपी प्रमोद गायकवाड हा सोलापूरचा वाल्मीक कराड असून त्याची शरद पवार गटातून हाकलपट्टी करा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

सोलापूरच्या सिद्धार्थ नगरमध्ये वैभव वाघे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. वैभवच्या हत्येनंतर सोलापुरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या हत्येच्या निषेधार्थ सोलापूरच्या सिद्धार्थनगर येथील वैभव वाघे नावाच्या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. वैभव वाघे याचा मारहाणीत मृत्यू झाला. वैभव वाघे हत्या प्रकरणात शरद पवार गटाचे प्रमोद गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.

वैभव वाघे या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ श्रद्धांजली वाहण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. सोलापुरातील विचार क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सोलापूर शहरातून काढण्यात कॅण्डल मार्च आला. प्रमोद गायकवाड हा सोलापूरचा वाल्मीक कराड असून त्यामुळे त्यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच वैभव वाघे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बहिणीने सांगितला हत्येचा घटनाक्रम

वैभव वाघची बहीण रूपाली जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. रुपाली म्हणाल्या, '३१ डिसेंबर रोजी एका सोसायटीत भिमाकोरगावला निघालेल्या मारहाण झाली होती. त्यांच्या मदतीला माझा भाऊ धावून गेला होता. तिथे गेल्यानंतर गायकवाड कुटुंबीयातील सदस्यांनी माझ्या भावाला मारहाण केली. त्याला तेव्हा कोणाची मदत मिळाली नाही. त्याला रुग्णालयातही कोणी नेलं नाही. गल्लीतील लोकांना धमकावलं होतं. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्याला उशिरा रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव गेला. माझ्या भावाला न्याय मिळो, ही अपेक्षा करते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejasswi Prakash: मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने मुंबईत खरेदी केलं अलिशान फ्लॅट, किंमत वाचून व्हाल अवाक

अहमदनगरमध्ये CRPF जवानांचा ट्रक कालव्यात कोसळला; स्थानिक पोलीस आणि नागरिकांची मदतीसाठी धावाधाव

Maharashtra Live News Update: काही राजकीय लोकांचा भ्रमाचा भोपळा लवकरचं फुटेल, आशिष शेलारांचा रोहित पवारांना टोला

T20 World Cup : सुपर ८ सामन्यांवेळी पाऊस पडला, तर गोंधळात पडू नका! ICC चे नियम जाणून घ्या

दुःखाचा डोंगर कोसळला! मुलीच्या लग्नाचा बस्ता आणण्याच्या दिवशीच घरी आणला वडिलांचा मृतदेह

SCROLL FOR NEXT