Miraj Crime : महालक्ष्मी मंदिरांत चोरी; दान पेटीसह देवीचे आभूषण केले लंपास

Sangli News : सांगली जिल्ह्यातील आरग येथील पद्मावती मंदिरात १८ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली यानंतर मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी केल्याचे समोर आले
Miraj Crime
Miraj CrimeSaam tv
Published On

मिरज (सांगली) : सांगलीच्या मिरज तालुक्यातील मंदिरांवर चोरट्यांचा डल्ला मारण्याचे सुरूच ठेवले आहे. आरग नंतर लक्ष्मीवाडी येथे महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी मंदिरात ठेवण्यात आलेल्या दानपेटीतील रक्कम तसेच गाभाऱ्यात प्रवेश करत देवीच्या अंगावरील सोन्या- चांदीचे दागिनेसह लंपास केले आहे. यात साधारण लाखो रुपयांचा ऐवज लांबविला आहे. 

सांगली जिल्ह्यातील आरग येथील पद्मावती देवीच्या मंदिरात चोरी करत १८ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना चार दिवसांपूर्वीच घडली आहे. यानंतर चोरट्यानी मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी केल्याचे समोर आले आहे. यामुळे आता मंदिर देखील सुरक्षित राहिले नसल्याचे बोलले जात आहे. मंदिरातील दानपेटी तसेच देवाच्या अंगावरील आभूषण चोरून नेत आहेत. 

Miraj Crime
Balaji Temple : चौकीदाराला बांधून ठेवत तिरुपती बालाजी मंदिरात दरोडा; दानपेटीतील लाखोंची रक्कम लांबवली, चोरटे सीसीटीव्हीत कैद Video

पैसे काढून दानपेटी फेकली ओढ्यात 

महालक्ष्मी मंदिरात चोरटयांनी प्रवेश करत दानपेटी उचलून नेली तसेच अडीच तोळे सोने आणि २ किलो चांदीचे दागिने देखील चोरून नेले आहेत. दरम्यान चोरीनंतर चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील पैसे काढून घेतले. यानंतर दानपेटी गावातल्या ओढ्यामध्ये फेकून दिली आहे. त्याचबरोबर चोरीच्या वेळी मंदीर परिसरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी लंपास केला आहे. 

Miraj Crime
Dhule Police : बनावट पावतींसह बायोडिझेल वाहतुकीचे टँकर जप्त; धुळ्यात चाळीसगाव चौफुली परिसरात कारवाई

पोलिसांकडून तपास सुरु 

दरम्यान सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या डीव्हीआर लांबविल्याने चोरट्यांची ओळख पटू शकलेली नाही. काही दिवसांपूर्वीच गावानजीक असणाऱ्या आरगमध्ये पद्मावती मंदिरात चोरीचा प्रकार घडला होता. त्या पाठोपाठ लक्ष्मीवाडी येथे घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे तालुक्यातल्या गावांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com