Balaji Temple : चौकीदाराला बांधून ठेवत तिरुपती बालाजी मंदिरात दरोडा; दानपेटीतील लाखोंची रक्कम लांबवली, चोरटे सीसीटीव्हीत कैद Video

Chandarpuar News : शनिवारी रात्री उशिरा एक व्यक्ती मंदिरात आला. त्याने मंदिराचे संपूर्ण निरीक्षण करत संपूर्ण परिसर तसेच गाभाऱ्यात देखील पाहणी केली. त्यानंतर सदर व्यक्ती निघून गेला
Chandrapur Balaji Temple
Chandrapur Balaji TempleSaam tv
Published On

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात सात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे. बंदुकीच्या धाकावर चौकिदाराला एका खोलीत बांधून ठेवले. यानंतर मंदिरातील कॅमेऱ्यावर कापड टाकून दानपेटीतील लाखो रुपयांची रक्कम लांबवविल्याची घटना शनिवारी मध्यरात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास घडली. या सशस्त्र दरोड्यामुळे शहरात आता मंदिर देखील सुरक्षित राहिलेले नाही, असे बोलले जात आहे. 

चंद्रपूर शहरातील दाताळा मार्गावरील ईरइ नदीच्या काठावर तिरुपती बालाजीचे मंदिर आहे. माजी खासदार तथा कामगार नेते नरेश पुगलिया हे मंदिर संचालित करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तथा त्यांनीच या मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिरात डिसेंबर महिन्यातच ब्रम्होत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला होता. तसेच मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शन व पूजा अर्चा करण्यासाठी येत असतात. 

Chandrapur Balaji Temple
Akola Farmer : भयावह! थर्मोकोल सिट्स, बांबूपासून तयार केलेल्या नावेतून जीवघेणा प्रवास; १५ वर्षापासून शेतकऱ्यांची शेतीसाठी कसरत

मंदिरात अगोदर येत एकाने केली पाहणी 

दरम्यान शनिवारी रात्री उशिरा एक व्यक्ती मंदिरात आला. त्याने मंदिराचे संपूर्ण निरीक्षण करत संपूर्ण परिसर बघितला. तसेच तिरुपती बालाजीची मूर्ती आहे; त्या गाभाऱ्यात देखील पाहणी केली. त्यानंतर सदर व्यक्ती निघून गेला. यानंतर साधारण रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांनी सर्व प्रथम मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकून कॅमेरे बंद केले. 

Chandrapur Balaji Temple
Nashik Police : नाशिक शहरात पुन्हा एमडी ड्रग्स सापडले; पंचवटी परिसरातून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चौकीदाराला खोलीत ठेवले बांधून 

त्यानंतर मंदिरातील चौकीदाराला बंदुकीने धाक दाखवून दोन्ही हात बांधून एका खोलीत बांधून ठेवले. यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दानपेटी फोडली व त्यातील लाखो रुपये घेऊन पसार झाले. यावेळी सातही दरोडेखोरांनी तिरुपती बालाजी यांची मूर्ती असलेल्या मंदिराचे दरवाजे तसेच लगतच्या मंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे कुलूप न तुटल्यामुळे चोरटे निघून गेले.

रात्री दोन वाजताच्या सुमारास चौकीदाराने स्वतःची कशीबशी सुटका करत ट्रस्टींना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यादव त्यांची संपूर्ण टीम घेऊन मंदिरात दाखल झाले. रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com