Nashik Police : नाशिक शहरात पुन्हा एमडी ड्रग्स सापडले; पंचवटी परिसरातून चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Nashik News : नाशिक शहरात अंमली पदार्थ पकडण्याची मोठी कारवाई काही महिन्यांपूर्वी झाली होती यानंतर देखील शहरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे पंचवटी परिसरात झालेल्या कारवाईवरून समोर आले
Nashik Police
Nashik PoliceSaam tv
Published On

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिक शहरात अनेकदा ड्रग्स पकडण्याची कारवाई करण्यात आली आहे. यात नाशिक शहरात अमली विरोधी पथकाने पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एमडी मॅफेड्रॉन विक्री करणारे तीन महिला व एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले असून नाशिक शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या अमृतधाम या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

नाशिक शहरात अंमली पदार्थ पकडण्याची मोठी कारवाई मागील काही महिन्यांपूर्वी झाली होती. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. यानंतर देखील शहरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे पंचवटी परिसरात झालेल्या कारवाईवरून समोर आले आहे. हि कारवाई झाली असताना देखील चोरून लपून ड्रग्स विक्री व वापर केला जात आहे. हि विक्री पूर्णपणे रोखण्यात पोलिसांना यश मिळत नसल्याचे समोर आले आहे. 

Nashik Police
Shahapur Crime : पाणी बॉटल घेण्यास खाली उतरताच साधला डाव; शिवशाही बसमधून प्रवास करताना दीड कोटीचे दागिने लंपास

4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत  

एमडी हा अंमली पदार्थ विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या मिळालेली माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाई नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून चार लाख पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचा ७८.५ ग्रॅम अमली पदार्थ हस्तगत केला आहे. तर इतर १ लाख ९७ हजार ८२० रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.

Nashik Police
Akola Farmer : भयावह! थर्मोकोल सिट्स, बांबूपासून तयार केलेल्या नावेतून जीवघेणा प्रवास; १५ वर्षापासून शेतकऱ्यांची शेतीसाठी कसरत

विक्रेत्यांचे धाबे दणाणले 

अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नाशिक शहरात पुन्हा एकदा एमडी ड्र्क्स विरोधात मोठी कारवाई करण्यात आल्याने नाशिक शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. आता काही दिवस अंमली पदार्थांची विक्री बंद राहणार असल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com