ST Bus  Saam tv
महाराष्ट्र

Solapur News : धुळ्यानंतर सोलापुरात एसटी बसवर दगडफेक; प्रवाशांमध्ये पसरली भीती, नेमकं काय घडलं?

Solapur News : धुळ्यानंतर सोलापुरात एसटी बसवर दगडफेकीची घटना घडली. दगडफेकीनंतर प्रवाशांमध्ये भीती पसरली. या घटनेत कोणताही प्रवासी गंभीर जखमी झालेला नसल्याची माहिती मिळाली आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या विरोधात आज आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी दुकाने देखील बंद केली. तसेच आज धुळ्यात १० ते १२ जणांनी एसटी बसवरही दगडफेक केली. त्यानंतर आता सोलापुरात एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

धुळ्यात दसरा मैदान स्टॉपजवळ नाशिकहून शहाद्याकडे जाणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. या दगडफेकीनंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली होती. तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. धुळ्यानंतर सोलापुरात एसटी बसवर दगडफेकीची घटना घडली. सोलापुरातही अज्ञात व्यतींनी ३ एसटी बसवर दगडफेक केली.

सोलापुरातील डी मार्ट आणि सम्राट चौक परिसरात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. सोलापूरहून तुळापूरला जाणाऱ्या दोन गाड्या आणि सोलापूरहून साताऱ्याला जाणाऱ्या एक गाडीवर दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ही दगडफेक नेमकी कुणी केली, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहेत. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला त्रास झालेला नाही. सर्व परिस्थिती पूर्ववत झाली असून वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.

दरम्यान, धुळ्यातील दसरा मैदान स्टॉपजवळ एका एसटी बसवर अज्ञात व्यक्तींवर दगडफेक केली. या दगडफेकीनंतर बस चालकाने बस तत्काळ थांबवून परिस्थिती नियंत्रणात आणली. धुळ्यातील एसटी बसवरील दगडफेक ही परभणी प्रकरणाचे पडसाद असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच एसटी बसजवळ धाव घेतली. या दगडफेकीनंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरु केल्याची माहिती हाती आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT