Shruti Vilas Kadam
१ लिटर फुल क्रीम दूध, २ चमचे लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, १ कप साखर, ४ कप पाणी, ८-१० काजू बारीक चिरलेले, ८-१० बदाम बारीक चिरलेले, १ चमचा पिस्ता बारीक चिरलेला, ४-५ वेलची पूड, ८-१० केशराच्या काड्या , २ चमचे कोमट दूध, १ चमचा मैदा किंवा कॉर्नफ्लोअर (आवश्यक असल्यास गोळे बांधण्यासाठी)
दूध उकळवून त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला. दूध फाटल्यानंतर छेना स्वच्छ कपड्यात गाळून घ्या आणि पाण्याने धुऊन घ्या.
छेना चांगला निथळल्यानंतर हाताने किंवा तळहाताच्या मदतीने मऊ होईपर्यंत मळा. छेन्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
छेन्याचे छोटे भाग घेऊन त्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता आणि वेलचीचे मिश्रण भरू शकता. गोळे व्यवस्थित बंद करून गुळगुळीत करा.
राजभोगाला सुंदर पिवळा रंग आणि सुगंध देण्यासाठी केशर वापरा. केशर काही वेळ कोमट दुधात भिजवून ठेवले तर त्याचा रंग चांगला येतो.
एका भांड्यात साखर आणि पाणी घेऊन उकळी आणा. पाक खूप घट्ट न करता पातळसर ठेवणे महत्त्वाचे आहे.
तयार पाकात राजभोगाचे गोळे अलगद सोडा. झाकण ठेवून मध्यम आचेवर काही मिनिटे शिजवा. गोळे फुगून आकाराने मोठे होतील. राजभोग पाकात चांगला मुरल्यानंतर थंड होऊ द्या. वरून पिस्ता किंवा केशर घालून सर्व्ह करा. घरच्या घरी तयार केलेली ही मिठाई खास प्रसंगी नक्की करून पाहा.