Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

Marathi Breaking Live Headlines Updates: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर, सरकारचा मोठा निर्णय, दुष्काळग्रस्त भागांचा पंचनामा होणार, राज्याला मुसळधार पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

भामरागडकरांना थोडा दिलासा - पर्लकोटा नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होऊ लागली - पुराचे पाणी ओसरल्याने जनजीवन सुरळीत होत आहे - मात्र 250 घरांमध्ये झालेल्या नुकसानीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे - प्रशासनाकडून पंचनाम्याची मागणी.

सोलापूरहून साताऱ्याच्या कास पठार फिरण्यासाठी आलेल्या बसचा ब्रेक फेल

कास पठारा हून परत येत असताना यवतेश्वर घाटात झाला अपघात

एसटी मध्ये 32 प्रवासी

घाटामध्ये ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत एसटी डोंगराच्या बाजूला घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला

या अपघातात बसमधील चालक किरकोळ जखमी तर एक प्रवासी गंभीर जखमी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासनाची तातडीची बोलवली बैठक

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत दुष्काळ नियोजन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली, यावेळी या पार पडलेल्या बैठकीत

धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांचा दुष्काळाच्या ‘ट्रिगर-1 यादीमध्ये समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीला संवेदनशीलपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने सामोरे जावे, तसेच पिण्याचे पाणी, रोजगार, जलसंधारण, शेती, अन्नधान्य, पशुधनासाठी चारा आणि वीजपुरवठा या बाबींना सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक संबंधित यंत्रणेने तातडीने कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत,

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली दुष्काळी भागाची पाहणी

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळच्या कळंब तालुक्यातील नरसापूर येथील दुष्काळग्रस्त शेत पीकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधुन पीक परिस्थिती, वीज, पाणी उपलब्धतेबाबत विचारपूस केली. तसेच पीक पाहणी,पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच राज्य शासनाने २६५ गावात दुष्काळ जाहीर केला आहे. शासन गतीने काम करत आहे.शेतकऱ्यांच्या मदतीत कमतरता पडणार नाही.शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. दरम्यान यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख हजर होते.

मंत्री छगन भुजबळ पोहोचले येवल्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर..

मंत्री छगन भुजबळ यांनी आज आपल्या मतदार संघ असलेल्या येवला तालुक्यातील राजापूर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली,यावेळी मंत्री भुजबळ यांच्यासमोर शेतकऱ्यांनी शेती पिकांच्या व्यथा मांडल्या.खरीप हंगामातील मका, बाजरी, कपाशी आदी सर्व पिके वाया गेली.पिके करपल्याने जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न उद्भवणार आहे.भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न उभा राहणार आहे.. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाने भरगोस मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही.दुष्काळ सर्वत्र आहे.शेतकऱ्यांना सर्वोतोपरी जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना दिले..यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपापल्या शेतीच्या व्यथा मांडल्या..

अनधिकृत झोपड्यांच्या तोडक कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक

1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंत 14 फुटांपेक्षा मोठ्या अनधिकृत झोपड्यांवर हातोडा चालवण्याचा निर्णय

महापालिकेच्या निर्णयाविरोधात मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड उद्या दुपारी महापालिका आयुक्तांना भेटणार

आधी पुनर्वसन करून मग कारवाई करा, अशी काँग्रेसची मागणी

पितृपक्ष सुरू होताच राज्यातील राजकीय पक्ष सावध भूमिकेत.

मुख्य म्हणजे सत्ताधारी पक्ष अधिक सावध भूमिकेत

आपल्याला पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून सूचना

पितृपक्षात पक्षीय स्तरावर कोणत्याही घडामोडी घडू देऊ नका.

पक्षप्रवेश, मोठे कार्यक्रम, मोठे निर्णय अशा कोणत्याही गोष्टी करू नका.

विश्वसनीय सूत्रांची माहिती

राज्यातील शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबत हालचालींना वेग

पवारांच्या राष्ट्रवादीची २ दिवसात ठरणार भूमिका - सूत्र

२ दिवसात राष्ट्रवादीचे नेते ठाकरेसेना आणि काँग्रेस नेत्यांची भेट घेणार

शिक्षक आणि पदवीधर निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढायची की स्वबळावर यावर होणार चर्चा - सूत्र

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासनाची तातडीची बोलविली बैठक

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत दुष्काळ नियोजन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली, यावेळी या पार पडलेल्या बैठकीत

संजय राऊत म्हणजे बिनडोक - गोपीचंद पडळकर

संजय राऊत म्हणजे बिनडोक,अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्याच्यावर टीका केली आहे,संजय राऊत सारख्या माणसाला कोण समजावून सांगणार,प्रक्रिया काय असते,त्यांना फक्त बातम्या,ब्रेकिंग न्यूज,हेडलाईन पाहिजे, त्यांना शेतकऱ्यांचे काय पडलंय ? सरकार मध्ये असताना त्यांना काही जमलं नाही,आता तर ते विरोधात आहेत,त्यामुळे अशांच्या वर बोलणं मला योग्य वाटत नाही,असा टोला देखील गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांना पडळकरांनी लगावला आहे,

बारामती शहर आणि परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात

बारामती शहर आणि परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात

लक्ष्मण हाके यांना पुणे ग्रामीण पोलिसांची नोटीस

लक्ष्मण हाके यांना पुणे ग्रामीण पोलिसांची नोटीस

पाटस तालुका दौंड पोलिसांनी लक्ष्मण हाके आणि ओबीसी आंदोलकांना पाटस येथील ओबीसी आंदोलना प्रकरणी बजावली नोटीस

मालेगावी प्राध्यापकाच्या मृत्यू प्रकरणी मूक मोर्चा

मालेगावातील म्यूनिसिपल हायस्कूलमधील शिक्षक सोपान बोरसे यांच्या मृत्यूप्रकरणी शिक्षण विभागातील अधिकारी व संबंधितांसह नऊ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधावा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशासकीय चौकशीच्या नावाखाली मानसिक त्रास देऊन, गुन्हा दाखल करण्याची धमकी देत अपमानित केल्यामुळे बोरसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता. मात्र त्या प्रकरणात अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही, त्यांना अटक करावी यासह विविध मागण्यांसह लोकशाही धडक मोर्चा तर्फे हा मोर्चा काढण्यात आला.

निवडणूक आयुक्तांच्या कारभाराविरोधात बदलापुरात शरद पवार गटाचं आंदोलन

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आणि त्यांनी घेतलेले निर्णय लोकशाहीला घातक असल्याचा आरोप करत बदलापूरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या 'रिमोट कंट्रोल'वर चालत असल्याचं दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान प्रात्यक्षिक सादर करून अनोखा निषेध नोंदवला. यावेळी ज्ञानेश कुमार आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात शिवाजी पार्कवर एल्गार; CJP चे पोलिसांना थेट पत्र

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात 'सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीस' (CJP) या संस्थेने आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने आणि आंदोलन करण्यासाठी CJP कडून मुंबईतील शिवाजी पार्क पोलिसांकडे पत्राद्वारे अधिकृत परवानगी मागण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ३ ते रात्री ९ या वेळेत दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर हे आंदोलन आयोजित करण्याचा CJP चा मानस आहे. या ५ ते ६ तासांच्या आंदोलनासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांना पत्र देऊन परवानगीची विनंती करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्रतिसादानंतर या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात तहसीलदारांची खुर्ची जाळली

धाराशिवच्या उमरगा येथील तहसीलदारांची खुर्ची जाळल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांना उमरगा येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.यावेळी दुसरे सह दिवाणी न्यायाधीश के. एन.निवडंगे यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.न्यायालयीन कोठडीची जामीन झाल्यानंतर माडज येथील मराठा आंदोलक वैजनाथ काळे हे गावी परतले.यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. काळे यांच्यावर ५० लिटरहून अधिक दुधाचा दुग्धाभिषेक करण्यात आला.या अनोख्या स्वागताची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या जागा परंपरागत भाजपाच्या -दोन्ही जगावर आमचा दावा - मंत्री चंद्रकांत पाटील.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या जागा परंपरागत भाजपाचे असून या दोन्ही जागांवर भाजपाचा दावा असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे.मात्र महायुती म्हणून दोन्ही मतदारसंघात आम्ही लढणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील,आणि ते जो निर्णय घेतील,तो आम्हाला मान्य असेल,असे देखील चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केला आहे.पुणे पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे, तर शिक्षक मतदार संघात शिवसेना शिंदे पक्षाकडून दावा करण्यात आला आहे, त्यामुळे महायुती मध्ये जागांचा तिढा निर्माण झाला आहे,यावरुन मंत्री चंद्रकांत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

निवडणूक आयोगाच्या (ECI) कामकाजाबाबत 'द इंडियन एक्सप्रेस' दैनिकाने दिलेला अहवाल धक्कादायक आहे. निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे, जिची निर्मिती संविधानाच्या कलम ३२४ अन्वये आणि २०२३ मध्ये संसदेने केलेल्या कायद्याद्वारे झाली आहे. १९९५ मधील 'टी.एन. शेषन विरुद्ध भारत सरकार' या खटल्यातील ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांची भूमिका आणि अधिकार स्पष्टपणे निश्चित केले आहेत.
पृथ्वीराज चव्हाण

आश्रमशाळेतील ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

अमरावतीच्या भातकुली येथील मातोश्री गौराबाई गुढे अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मेळघाट मधील राणीगाव येथील प्रिया गणेशराव मावसकर हिला छातीत वेदना होत असल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आदिवासी मुलीच्या मृत्यूची सखोल चौकशी करा अशी मागणी करण्यात आली आहे.

आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा...

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला प्रांत अधिकारी बी. ए. कापसे, नंदुरबार तहसीलदार संतोष डेरे आणि तालुका कृषी अधिकारी के. ए. ठाकूर उपस्थित होते.यावेळी डॉ. गावित यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करत शेतकरी, नागरिक आणि जनावरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी तातडीने उपाययोजना व कृती आराखडा तयार करण्याच्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांची सिल्वर ओकवर बैठक

जाहीर झालेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यासाठी बैठक

पुणे पदवीधर मतदारसंघात पक्षाची ताकद असल्यानं निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत होणार चर्चा

छत्रपती संभाजीनगर आणि कोकण पदवीधर मतदारसंघातही पक्षाची ताकद

महाविकास आघाडी म्हणून लढल्यास कोकणातही फायदा होण्याची शक्यता असल्यानं त्यावरही चर्चा होणार - सूत्र

दिव्या शिंदेला पोलिसांनी केली अटक

बिग बॉस ची माजी स्पर्धक आणि सोशल मिडिया इन्फ्ल्यूएनसर दिव्या शिंदे ला पोलिसांनी केली अटक

डॉक्टरला मारहाण आणि खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी केली अटक

काळेपडळ पोलिस ठाण्यात दिव्या शिंदे वर खंडणी आणि मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिव्या शिंदेला न्यायालयात केलं हजर

अनधिकृत बांधकामांविरोधात नितीन भालेराव यांचे आमरण उपोषण;

उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे, नाल्या-गटारे बंद करणे तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या समस्यांबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नितीन भालेराव यांनी महापालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून, अद्याप प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही भालेराव यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित समस्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सोयीचे कायदे करून सहकार ताब्यात ठेवण्याचे काम काँग्रेसने केलं - मंत्री चंद्रकांत पाटील

वर्षानुवर्षे सोयीचे कायदे करून, सहकार ताब्यात ठेवण्याचे काम काँग्रेसने केलं होतं,अशी टीका भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केली.तसेच सहकार मंत्री असताना आपण आघात करून काँग्रेसचे कायदे बदलून घेतले,असं देखीलमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये भाजपाची बैठक पार पडली, आजी-माजी आमदार यांच्यासह बँकेचे आजी-माजी संचालक आणि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ताकतीने लढवणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

दुष्काळ जाहीर करण्याचा शासनाचा निर्णय योग्य वेळी घेतला असून, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तो गरजेचा होता, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळाच्या घोषणेतून सुटल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत चर्चा करण्यासाठी मुनगंटीवार यांनी 28 तारखेला मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या सिंचनासाठी मोठा निधी देण्याचे मोदींचे आदेश; कंत्राटदारांवर कारवाईचे गिरीश महाजनांना निर्देश 

उत्तर महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे सांगण्यात आले. कामाचा दर्जा योग्य नसेल तर संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून कारवाई करण्याचे निर्देश मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले. कारवाई करताना कोणत्याही दबावाची चिंता करू नका, असेही या वक्तव्यात सांगण्यात आले.

नवी मुंबईच्या महापौरांचा अमेरिका दौरा चर्चेत; ₹28 लाखांच्या खर्चावरून विरोधकांचा सवाल

नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या अमेरिका अभ्यास दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या दौऱ्यासाठी तब्बल २८ लाख रुपयांच्या प्रवास खर्चाला प्रशासनाने मंजुरी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. शेतकरी दुष्काळाचा सामना करत असताना महापौरांची परदेशवारी कशासाठी, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांबाबतच्या भूमिकेचा संदर्भ देत, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या आवाहनाचे पालन भाजप करणार का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

पोलादपुरमध्ये जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 35 जणांवर गुन्हा, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

रायगडच्या पोलादपुर तालुक्यातील लोहारे गावच्या हद्दीत पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत मोबाईल, वाहने आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे कॉईन असा सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बंदी असतानाही छुप्या पद्धतीने जुगार खेळल्याप्रकरणी 35 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदींनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पावसाने पाठ फिरवली, शेतकऱ्याने उभ्या कपाशीवर फिरवला नांगर; उत्पादनाची आशा मावळली

नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने दडी मारल्याने कपाशी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरात पावसाअभावी कपाशीची वाढ खुंटली असून बोंडधारणाही अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. उत्पादनातून लागवडीचा खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाल्याने देवारपाडे येथील भैय्यासाहेब वाळके व जुलाल वाळके यांनी उभ्या कपाशीवर नांगर फिरवला. पिकावर रोटावेटर फिरवताना शेतकऱ्यांनी पावसाअभावी झालेल्या नुकसानीबद्दल हतबलता व्यक्त केली.

नीरा शहरात चपलांच्या गोदामाला आग; लाखोंचा माल जळाला

पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातील प्रमुख बाजारपेठेत चपलांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोदामातील चपलांचा मोठ्या प्रमाणात साठा जळून खाक झाला असून व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

साईबाबांच्या चरणी 4 लाख 56 हजारांचा सोन्याचा ब्रोच अर्पण

साईबाबांच्या चरणी देशभरातील भाविक भरघोस दान करत असतात..

याच भक्तीभावातून नागपूर येथील साईभक्त अभिजीत वडनेरे यांनी साईबाबांच्या चरणी सोन्याचा आकर्षक 'ॐ' ब्रोच अर्पण केला आहे.

राहुल गांधींना संविधान मान्य नाही - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री लवकरच कोकणातील दुष्काळाची पाहणी करणार

मुख्यमंत्री लवकरच कोकणातील दुष्काळाची पाहणी करणार

पालकमंत्री नितेश राणेंनी केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

अटक करण्यात आलेले दोन्ही उमेदवार परीक्षेत अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाल्याच उघड

राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात संशयित केमिकल गळती; दोन तरुणांचा मृत्यू

राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात संशयित केमिकल गळती; दोन तरुणांचा मृत्यू

राम मंदिर (पूर्व) येथील मृणालताई ब्रिजजवळ, पारसी पंचायत गेटसमोर घटना

सार्वजनिक शौचालयातून रासायनिक वास येत असल्याची स्थानिकांची माहिती

डीजे गुलालमुक्त विसर्जनातून लयभारीचा आदर्श

डीजे गुलालमुक्त विसर्जनातून लयभारीचा आदर्श..

वारकरी दिंडी, विठू गजर अन् फुलांच्या वर्षावात बाप्पाला निरोप

“चैन पडेना आम्हाला!” म्हणत कुणाल सरमळकर यांचे ट्विट चर्चेत

“चैन पडेना आम्हाला!” म्हणत कुणाल सरमळकर यांचे ट्विट चर्चेत

शिवसेना शिंदे गटाचे वांद्रे पूर्व विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांचे ट्विट

दिशा सालियान प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना थेट टॅग

पेंग्विनच्या पोस्टचा संदर्भ देत सरमळकर यांच्याकडून खोचक ट्विट

दिशा सालियान प्रकरणात सीबीआयकडून गुन्हा दाखल

Dharashiv: सरकारकडून दुष्काळ जाहीर मात्र ठाकरेसेनेकडून गेल्यावर्षी अतिवृष्टीच्या जाहीर केलेल्या मदतीचा पंचनामा केला सुरू

धाराशिव -

सरकारकडून दुष्काळ जाहीर मात्र ठाकरेच्या शिवसेनेकडून गेल्यावर्षी अतिवृष्टीच्या जाहीर केलेल्या मदतीचा सुरू केला पंचनामा

सरकारने अतिवृष्टीत खरडून गेलेल्या जमिनीसाठी मदत केली होती जाहीर, पण शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही

सरकार या ही दुष्काळात मदतीचे गाजर देत असल्याचा आरोप

सरकारचे डोळे उघडण्यासाठी बांधावर ची वस्तुस्थितीची ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांनी पाहणी करत केला पंचनामा

केवळ घोषणा करून जाहीरात बाजी न करता गेल्यावर्षीची व यंदाची थेट मदत करा,आमदार पाटील यांची मागणी

Hingoli: गणेश विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन

हिंगोली -

गणेश विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन

औंढा पोलीस स्टेशनमध्ये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल

पोलिसांनी मिरवणुकीत वाजवलेले डिजे जप्त करत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले

औंढा शहरात दाखल झालेल्या डीजेच्या कार्यवाहीमुळे नागरिकांनी केले कौतुक

Latur: लातूर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला, उभ्या पिकांवरून फिरवला नांगर

लातूर -

लातूर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला

उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची शेतकऱ्यावर वेळ

रेणापूरच्या शेतकऱ्यांची दैनिय अवस्था.

Nagpur: नागपूर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

- नागपूर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

- पर्जन्याची तूट आणि इतर घटकांमुळे शासनाचा निर्णय

- प्रथम कळ म्हणजेच Trigger-१ अंतर्गत १४ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

- राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून २५ सप्टेंबरला शासन निर्णय जारी

- नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी आणि मौदा तालुक्यांचा समावेश

- भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक आणि हिंगणा तालुक्यांनाही दुष्काळाचा फटका

- उमरेड, कुही, नरखेड आणि नागपूर शहराचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

Pune: श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाची अवघ्या ४ तासात विसर्जन मिरवणूक संपन्न, पुणे शहरातील गणेश मंडळांना दिला आदर्श

पुणे -

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाची अवघ्या ४ तासात विसर्जन मिरवणूक संपन्न

पुणे शहरातील गणेश मंडळांना दिला आदर्श

गर्दीचे नियंत्रण आणि प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेता मंडळाकडून विसर्जन लवकर मार्गस्थ करण्याचा निर्णय ठरला फायदेशीर

सार्वजनिक गणेश मंडळं आणि घरगुती गणपतींना निरोप देताना

पुणे शहरात एकूण ६ लाख २४ हजार ६८५ घरगुती गणपतींचे विसर्जन

शहरातील ४१७० गणेश मंडळांनी दिला गणरायाला निरोप

Panvel: पनवेल विधानसभा मतदारसंघात दुबार मतदारांचा घोळ

पनवेल विधानसभा मतदारसंघात दुबार मतदारांचा घोळ

अधिक नावे दुबार असल्याचा दावा

भाजप नेते प्रीतम म्हात्रे दोन्ही मतदार संघामध्ये त्यांची नाव आढळून आलेले खळबळ

Amravati: अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनामाचे आदेश

अमरावती -

अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनामाचे आदेश

अमरावती जिल्ह्यात त्रीस्तरीय समिती करणार पंचनामे

या समितीमध्ये तलाठी,कृषी सहायक व ग्रामसेवक यांचा समावेश असून ते गाव पातळीवर करणार पंचनामे

यामध्ये प्रत्येक गावातील पाच प्लॉटमधील नुकसान मोजण्यात येऊन त्याची सरासरी काढण्यात येईल व नुकसानीचे प्रमाण ठरवण्यात येणार आहे

Pune: पुणे पोलिसांची मोठी कारवाई! कटर, लाल मीर्ची पावडर घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्यांचा डाव उधळला

पुणे

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! कटर, लाल मीर्ची पावडर घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्यांचा डाव उधळला

विसर्जन मिरवणुकी दरम्यान भक्तांचे मोबाईल चोरी करुन दरोडयाच्या तयारीत असणाऱ्या ११ जणांना पुणे पोलिसांनी केली अटक

६३ महागडे फोन, एक कार असा एकुण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश

Yavatmal: कर्ज आणि मुलीच्या उपचाराच्या चिंतेने शेतकऱ्याने संपवलं जीवन

यवतमाळ -

कर्ज आणि मुलीच्या उपचाराच्या चिंतेने शेतकऱ्याने संपवलं जीवन

घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील घटना

यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच

Yavatmal: यवतमाळ - शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती

यवतमाळ - शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती

यंदा पावसाचा मोठा खंड पडल्याने खरिपातील कापूस, सोयाबीन - तूर आदी पिकांचे 50% पेक्षा अधिक नुकसान झालेत.

यवतमाळ जिल्हा प्रशासनाने अहवाल सादर केल्यानंतर शासनाने जिल्ह्यातील सोहळाही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला.

दुष्काळाच्या ट्रिगर एकच्या अनुषंगाने पिकांचे पंचनामे करावे सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शवणारे छायाचित्र व जीपीएस कोऑर्डिनेट्स संकलन करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी माफी मागावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

राहgल गांधींनी देशाच्या जनतेची माफी मागावी.

संवैधानिक संस्थांना सतत बदनाम करणे, लोकशाही प्रक्रियांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि जनतेत संभ्रम पसरवणे हाच या ‘इंडी’ आघाडीचा मूळ स्वभाव

‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांनी देशाचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना बदनाम करण्याचा व त्यांच्यावर पातळी सोडून टीका करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला

राहुल गांधी आणि त्यांच्या नेत्यांनी माफी मागावी

Nanded: नांदेडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचा शिंदेसेनेच्या आमदाराविरोधात संताप

नांदेड -

नांदेडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचा शिंदेसेनेच्या आमदाराविरोधात संताप

जवळपास दोन महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतातील पीक गेली करपून.

करपलेलं सोयाबीन पेटवून शिंदे सेनेचे आमदार आनंद बोंढारकर यांचा शेतकऱ्याने केला निषेध.

नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर आज मतदारसंघातील वाडीपुयड येथे दुष्काळी परिस्थितीची केली पाहणी.

सोयाबीनच्या शेंगमध्ये दाणा न भरल्याने आमदारा समोरच संतप्त शेतकऱ्याने पेटवले सोयाबीन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com