धुळ्यात एसटी बसवर 10 ते 12 जणांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना आज घडली आहे. नाशिक - शहादा बसवर ही दगडफेक करण्यात आली आहे. यात बसमधील काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. परभणीच्या घटनेचा हा पडसाद असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राज्यभरात परभणीच्या घटनेत पडसाद आता उमटताना दिसत आहेत. परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या प्रकरणावरून राज्यभरात आंदोलन केली जात आहेत. धुळ्यात आज एसटी बसवर 10 ते 12 जणांनी दगडफेक केली असल्याची माहिती समोर आली आहे. ही दगडफेक नाशिक - शहादा या बसवर झाली असून यात बसमधील प्रवासी जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच धुळे पोलिसांनी घटनास्थळी दखल होत पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.