Solapur Breaking News Saamtv
महाराष्ट्र

Solapur Accident: भीषण अपघात! भरधाव दुचाकी झाडावर आदळली; ३ जिवलग मित्र जागीच ठार

Solapur Breaking News: सोलापूर शहरातील महावीर चौकात आज रात्री (२९, जानेवारी) दुचाकी झाडावर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

विश्वभूषण लिमये

Solapur Accident News:

सोलापूरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील महावीर चौकात काल रात्री (२९, जानेवारी) दुचाकी झाडावर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने मुलांच्या आई वडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुळे सोलापूर (Solapur) भागात राहणारे इरण्णा मठपती,निखिल कोळी आणि आतिश सोमवंशी हे तिघे मित्र मध्यरात्री दीडच्या सुमारास आपल्या पल्सर गाडीवरुन घरी जात होते. शहरातील महावीर चौकात त्यांची गाडी झाडावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की तिघेही तरुण गाडीवरुन लांब उडून पडले.

या अपघातात तरुणांच्या डोक्याला जबर जखम लागल्याने ते जागेवरच ठार झाले. दुर्देवी बाब म्हणजे यामधील इरण्णा मठपती या तरुणाचा वाढदिवसही होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या त्या तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी केली आहे. मृत तरुणांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अहमदनगरमध्ये भीषण अपघात, एकाच घरातील चौघांचा मृत्यू..

दरम्यान, रविवारी (२८, जानेवारी) रात्री अहमदनगरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली होती. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

SCROLL FOR NEXT