Hemant Soren : झारखंडचे CM हेमंत सोरेन यांचे पाय आणखी खोलात; ED अधिकारी सकाळी सकाळी घरी पोहोचले

Hemant Soren Latest News : ईडीचे अधिकारी सोमवारी सकाळीच हेमंत सोरेन यांच्या दक्षिण दिल्लीतील शांती निकेतन स्थित निवासस्थानी पोहोचले. त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
Hemant Soren ED inquiry
Hemant Soren ED inquirySAAM TV
Published On

ED team at Hemant Soren Delhi residence :

कथित जमीन घोटाळा प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) पथक सोमवारी सकाळीच दिल्लीत हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहोचले. सोरेन हे घरीच असल्याचे सूत्रांकडून समजते. ईडीचे पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने हालचाली वाढल्या असून, दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दल तैनात असून, सोरेन यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ईडीचे (ED) अधिकारी सोमवारी सकाळीच हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या दक्षिण दिल्लीतील शांती निकेतन स्थित निवासस्थानी पोहोचले. त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सोरेन यांनी स्वतःच चौकशीसाठी तपास यंत्रणेला वेळ दिली होती की अचानक ईडीचे पथक चौकशीसाठी त्यांच्या घरी पोहोचले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

याआधी २० जानेवारी रोजी रांची येथे सोरेन यांच्या घरी ईडीने तब्बल सात तास त्यांची चौकशी केली होती. दुसरीकडे, झारखंड (Jharkhand) येथील सत्ताधारी पक्ष झामुमो कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरून याविरोधात संताप व्यक्त करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रांचीमध्येही सोरेन यांच्या निवासस्थानाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Hemant Soren ED inquiry
Nitish Kumar resigns as Bihar CM : बिहारमध्ये राजकीय भूकंप; नितीशकुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर RJDवर निशाणा, म्हणाले...

ईडीने मागितली होती वेळ

ईडीने २२ जानेवारी रोजी सोरेन यांना समन्स बजावले होते. २७ ते ३१ जानेवारी दरम्यान चौकशीसाठी वेळ मागितली होती. सोरेन यांनी एक पत्र ईडीला पाठवले होते. चौकशीसाठी वेळ सांगण्याबाबत त्यात उल्लेख होता. त्यानंतर ईडीने पुन्हा २५ जानेवारीला मेलद्वारे सोरेन यांना वेळ देण्याबाबत कळवले होते. जर त्यांनी वेळ दिला नाही तर, तपास अधिकारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करतील, असंही नमूद केलं होतं.

Hemant Soren ED inquiry
CAA Act News: येत्या ७ दिवसांत नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू होणार; केंद्रातील बड्या मंत्र्याचा दावा

सोरेन शनिवारीच दिल्लीत पोहोचले

मुख्यमंत्री सोरेन हे शनिवारी रात्रीच दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत त्यांनी कायदेशीर बाबींवर सल्लामसलत केल्याचे सांगण्यात येत आहे. सोरेन हे ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी २९ जानेवारीऐवजी ३१ जानेवारीची वेळ देण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com