झारखंडमध्ये कथित भूखंड घोटाळ्यातून मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीचं पथक मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानीदाखल झाले आहे. यामुळे कोणताही अनुचितप्रकार होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाया. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. तब्बल १००० पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंदन कुमार सिन्हा यांनी सांगितलं. (Latest News)
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रांची प्रशासनाने तपास यंत्रणेचे कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाभोवती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील वाहतुकीवर निर्बंध ठेवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्याने सांगितले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुख्यमंत्री (Chief Minister) सोरेन Soren यांना अंमलबजावणी संचालनालयाने (Directorate of Enforcement) १३ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. जानेवारी १६ ते २० जानेवारीदरमयान त्यांनी चौकशीसाठी उपलब्ध रहावे, असं एका पत्रातून सांगितलं होते. ईडीच्या पत्राला सोरेन यांनी उत्तर दिलं होतं. सोरेन यांनी आपण २० जानेवारी उपलब्ध असून ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी येऊन जबाब नोंदवू शकतात, असं सांगितलं. झारखंड मुक्ती मोर्चा (झामुओ ) आणि इतर आदिवासी संघटना निषेध आंदोलन करतील. त्यामुळे तपास यंत्रणांनी मुख्य सचिव, पोलीस महानिदेशक आणि रांचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी केली जाणार असल्याने अनेक आदिवासी संघटनांनी शुक्रवारी केंद्रीय तपास यंत्रणेच्या विरोधात आंदोलन केले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पारंपरिक शस्त्र धनुष्य-बाण, सरना धर्माचे झेंडे हातात घेऊन सोरेन यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.