Money laundering case: यादव कुटुंबियामागेही लागली ईडी; लालू यादव आणि तेजस्वी यादवांना ईडीचा समन्स

Lalu Prasad yadav : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद आणि त्यांचा मुलगा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना समन्स बजावलाय.
Lalu prasad yadav and tejaswi yadav
Lalu prasad yadav and tejaswi yadavANI X
Published On

Money Laundering Case:

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद आणि त्यांचा मुलगा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना समन्स बजावलाय. अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) त्यांना या महिन्याच्या अखेरीस पाटणा कार्यालयात हजर राहण्यास सांगितलंय. या दोन्ही नेत्यांवर जमिनीच्या बदल्यात रेल्वेतील नोकऱ्यांच्या कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. (Latest News)

लालू प्रसाद यादव यांना २९ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तर तेजस्वी यादव यांना ३० जानेवारीला चौकशीसाठीही बोलवण्यात आल्याची माहिती ईडीच्या अधिकृत सुत्रांनी दिलीय. अधिकाऱ्यांनी सांगितले की, समन्स बजावण्यासाठी एक टीम लालू प्रसाद यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पाटणा येथील सरकारी निवासस्थानी गेली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लालू यादव आणि तेजस्वी यांना पाटणा येथील बँक रोडवर असलेल्या ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणी यापूर्वी जारी केलेल्या समन्सवर दोघेही हजर झाले नव्हते. लालू प्रसाद यादव हे युपीएचं सरकार (संयुक्त पुरोगामी आघाडीचे) मध्ये रेल्वे मंत्री होते, त्यावेळी त्यांनी घोटाळा केला होता.

Lalu prasad yadav and tejaswi yadav
DeadBody Bag Scam: ठाकरे गटाचा आणखीन एक नेता चौकशीच्या फेऱ्यात; पेडणेकरांना ईडीचा समन्स

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com