DeadBody Bag Scam: ठाकरे गटाचा आणखीन एक नेता चौकशीच्या फेऱ्यात; पेडणेकरांना ईडीचा समन्स

ED Summons To Pednekar : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावलाय. मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६,८०० रुपयांना खरेदी केल्याचा दावा ईडीने केलाय
Kishori Pednekar
Kishori PednekarSaam Tv
Published On

ED Send Summons To Kishori Pednekar In Dead Body Bag Scam:

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप राज्यातील विरोधकांना चौकशीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्नात दिसत आहे. रवींद्र वायकर, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण आणि आमदार राजन साळवी यांच्यानंतर आता किशोरी पेंडणेकर चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकतात. आज ईडीने बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात ईडीने त्यांना समन्स बजावलाय. पेंडणेकरांना गुरुवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.(Latest News)

मुंबईच्या माजी महापौर (Former Mayor) आणि ठाकरे गटाच्या (Thackeray group) नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. कोरोना काळात मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यात करण्यात आलाय. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झालाय. यात किशोरी पेंडणेकर यांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणाचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६,८०० रुपयांना खरेदी केल्याचा दावा ईडीने केलाय. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणाचा तपास करताना ईडीने मागील वर्षी २१ जून रोजी राज्यभर छापे मारले होते. या छाप्यात ६८ लाख ६५ हजार रुपये रोकड, १५० कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. याशिवाय १५ कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. पेडणेकरांना आज ईडीने समन्स पाठवल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलीय. भाजपला विरोधी पक्षच नको आहे. भाजपकडून मॅरेथॉन कारवाई सुरू आहेत. भाजप सूडबुद्धीने कारवाई करत आहेत. भाजप अस्वस्थ झाल्याचं त्या म्हणाल्या.

रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. वायकर तसेच त्यांचे पार्टनर्स आणि निकटवर्तीयांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीचं धाडसत्र सुरू झालं आहे. सदर प्रकरणी एकूण ७ ठिकाणी ईडीकडून छापेमारी केली गेली. नोव्हेंबर २०२३ मध्ये रवींद्र वायकर यांच्यासह सहा जणांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला होता. जोगेश्वरीमधील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच, तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याच्या आरोप वायकरांवर आहे.

सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक

मुंबई महानगरपालिकेत कोविडकाळात १३२ कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. त्यात सूरज चव्हाण यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. याप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने सूरज चव्हाण यांना अटक केली.

Kishori Pednekar
Rohit Pawar: रोहित पवार यांना ईडीचे समन्स, चौकशीला हजर राहण्याच्या सूचना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com