Rohit Pawar: रोहित पवार यांना ईडीचे समन्स, चौकशीला हजर राहण्याच्या सूचना

ED Summons To Rohit Pawar: एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावले आहे.
ED Summons To Rohit Pawar
ED Summons To Rohit PawarSaam Tv
Published On

ED Summons To Rohit Pawar:

एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावले आहे. बारामती अग्रो कारखाना प्रकरणात ईडीने त्याना हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे.

आधीही ईडीने रोहित पवार यांच्याशी संबधित बारामती अॅग्रो कारखाना आणि याशी संबंधित सात ठिकाणी तपासणी केली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ED Summons To Rohit Pawar
Ram Murti Ayodhya: सुंदर रूप मनोहर....प्रतिष्ठापनेच्या आधी श्रीरामाचं घडलं दर्शन, पाहा 5 मिनिटांचा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने राबवण्यात आलेली लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली होती. या लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अॅग्रो कारखान्याचा काय संबंध होता? याचा तपास ईडी करत आहे. याचप्रकारणी ईडीने रोहित पवार यांना समन्स बजावलं असल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

ठाकरे गटाच्या आमदाराची एसीबी चौकशी

दरम्यान, गुरुवारी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने छापा टाकला होता. कथित बेकायदा संपत्ती प्रकरणी एसीबी अधिकाऱ्यांनी साळवींच्या घरी छापा टाकला होता. त्यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली.

ED Summons To Rohit Pawar
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतोय; जरांगेंच्या आंदोलनाच्या आदल्या दिवशीच CM एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

या प्रकरणी पोलिसांच्या एफआयआरमध्ये राजन साळवी यांच्यासहित त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावाचाही सामावेश आहे. गुरुवारी छापेमारी झाल्यानंतर साळवी यांनी एसीबी अधिकाऱ्यांना बँकेतील लॉकर दाखवले. त्यानंतर आमदार राजन साळवी यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. चौकशीच्या षडयंत्रामागे सरकारचा हात आहे,असा गंभीर आरोप यावेळी साळवी यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com